कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

धर्मद्वेषाचा ज्वर कोकणभूमीतून पसरविला जात आहे

04:16 PM May 04, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

Advertisement

कुडाळ -

Advertisement

आपल्या या देशात धर्मद्वेषाचा ज्वर समाजवादी विचारांची कोकणभूमी असलेल्या बँ.नाथ पै, प्रा.मधु दंडवते यांच्या भूमीतूनच पसरविला जात आहे. इतिहास पुसण्याचे काम केले जात आहे.ज्यांनी इतिहासाचे पहिले पानही वाचलेले नाही. तेच आज इतिहासावर बोलून लोकांची मने कलुषित करीत आहेत.आज मुस्लिम समाजावर आर्थिक बहिष्कार टाकून त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा स्पष्ट आरोप राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार) पक्षाचे नेते व सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी जितेंद्र आव्हाड यांनी कुडाळ येथे शनिवारी पत्रकार परिषदेत केला. मागील पराभवाची मरगळ झटकून येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हातात हात घालून एकत्र लढू ,असा विश्वासही येथील कार्यकर्त्यांनी बैठकीत व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले. कुडाळ येथील हॉटेल लेमन ग्रास येथे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारणीची बैठक श्री. आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक बशीर मुर्तजा , सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत,माजी राज्य मंत्री प्रवीण भोसले,प्रांतीक सदस्य प्रसाद रेगे, कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे - परब,राज्य उपाध्यक्षा नम्रता कुबल व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. श्री आव्हाड म्हणाले,कोकण दौऱ्याचा शुभारंभ व पहिला टप्पा काल कुडाळ येथून सुरू करण्यात आला. काल येथे झालेल्या बैठकीत अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी व उत्साह कार्यकर्त्यांमध्ये दिसला.मागील झालेल्या पराभवाच्या नैराश्येतून कार्यकर्ते बाहेर पडलेले दिसत आहेत. नैराश्य कार्यकर्त्यामध्ये होते.तशी ती आमच्यामध्येही पण होते.यातून सर्व जण पुन्हा एखदा उभे राहताना दिसत आहेत. आपण सर्वच पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या दहशतविरोधी विचाराचे व संविधान प्रेमी आहोत. फुले, शाहू ,आंबेडकर यांच्या विचारांवर प्रेम करणारे कार्यकर्ते आहोत.सर्वानी आता पक्षबांधणीच्या कामाला लागावे आपण केलेली विनंती सर्वानी कबूल केली आहे. जे झाले ते विसरून पक्षसंघटना मजबूत करू व स्थानिक स्वराज्य निवडणुकीत हातात हात घालून एकत्र लढू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे., असे त्यांनी सांगितले. या देशात धर्म द्वेषाचा ज्वर समाजवादी विचारांची भूमी असलेल्या बँ.नाथ पै, मधु दंडवते यांच्या कोकणच्या भूमीतूनच पसरवला जात आहे . हे अत्यंत दुखद आहे. या कोकण भूमीतून समाजवादी विचाराचे बँ नाथ पै., मधू दंडवते पुढे गेले बँ.नाथ पै याचे लोकसभेतील भाषण ऐकायला पं.नेहरू यायचे.,असे ते म्हणाले. आज मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याचं प्रयत्न काही लोक करीत आहेत. मुस्लिम समाजाच्या धंद्यावर परिमाण करून आज त्याची आर्थिक दृष्ट्या कमकुवत करण्याची रूपरेषा कार्यक्रम आखला जात आहे.तो जर सरकार पुरस्कृत असेल, तर ते चुकीचे आणि धोकादायक आहे. औरंगजेब ही आमच्या शौर्याची ओळख आहे असे उघडपणाने विधानसभेत म्हणणारा पहिला आपण होतो. आमच्या शिवाजी महाराज यांचे शौर्य ,आमच्या शंभुराजे यांचे शौर्य ही ओळख आहे. समाजामध्ये द्वेशाचे वितुष्ट आणून व दरी पाडून काही साध्य होणार नाही. सद्यस्थितीत महागाई , स्री अत्याचार यांचा कळस गाठला आहे. या सर्वांवर पांघरूण घालण्यासाठी हिंदू - मुसलमान यांचा वापर होत असेल, तर ते चुकीचे आहे.धर्मनिरपेक्ष भारतात धर्मनिरपेक्ष संविधान असतांना धर्मनिरपेक्षता हा आमचा आत्मा असलाच पाहिजे. मुस्लिम समाजाला जाणून बूजून निशाण्यावर ठेवून तुमचे राजकीय हित साधण्यासाठी देशाचे तुकडे करू नका,असा सल्ला श्री आव्हाड यांनी विरोधकांना दिला.

Advertisement
Tags :
# jitendra aawad # sindhudurg # ncp ## tarun bharat sindhudurg # konkan update
Next Article