महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

फोंड्यातील तिन्ही सार्वजनिक सुलभ शौचालये बंद

12:28 PM Dec 13, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जुन्या बसस्थानकावरील शौचालय जमिनदोस्त : बुधवार पेठ बाजार, नवीन बसस्थानकावरील शौचालये कुलुपबंद,प्रवासी, बसचालक-वाहक, महिला, ज्येष्ठ नागरिक व व्यापाऱ्यांचे प्रचंड हाल

Advertisement

फोंडा : फोंडा येथील जुने बसस्थानक परिसरातील सार्वजनिक सुलभ शौचालय मागील काही महिन्यापासून जमिनदोस्त अवस्थेत, बुधवार पेठ वरचा बाजार फोंडा व नवीन कदंब बसस्थानक येथील सार्वजनिक सुलभ शौचालये बंदावस्थेत असल्याने सामान्य नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. फोंडा पालीकेच्या सुस्त कारभारावर पादचारी महिलांनी संताप व्यक्त केला असून ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी तात्पुरता ‘बायो शौचालय’ची उभारणी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. पेंद्र सरकारने राबविलेल्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत देशातील प्रत्येक शहर उघडयावर शौचमुक्त करण्याच्या दृष्टिने सार्वजनिक ठिकाणी सुलभ शौचालय तसेच  प्रत्येक घरासाठी शौचालय असे धाडसी पाऊल उचलण्यात आले खरे पण हा दावा सद्या फोल ठरण्याचा मार्गावर आहे. फोंड्यातील नवीन बसस्थानक येथील सार्वजनिक सुलभ शौचालय मागील कित्येक महिन्यापासून बंदावस्थेत आहे. फोंडा इंदिरा मार्केट येथील जुने बसस्थानकावर कार्यान्वित असलेले सुलभ शौचलयाला अचानक कोणतीही पुर्वसूचना न देता जमिनदोस्त केलेले आहे. येथे तात्पुरती बायो टॉयलेटची सुविधा करण्यात आलेली आहे मात्र ती पुरत नसल्याची नागरिकांची तक्रार कायम आहे. बुधवार पेठ वरचा बाजार फोंडा येथील सुलभ शौचालय मागील दोन महिन्यापासून बंदावस्थेत आहे. तसेच पुरूष उघडयावर नैसर्गिक विधी करू लागल्याने सर्वत्र दुर्गधीचे वातावरण पसरलेले आहे.

Advertisement

फोंड्यातील सार्वजनिक शौचालये बंदावस्थेत 

जुने बस्थानक येथील सुलभ शौचालय अचानक बंद करण्यामागे जुनी इमारत पाडून त्याजागी नवीन इमारत उभारण्याचा प्रस्ताव असल्याचे ऐकिवात येत आहे. सद्या येथील सुलभ शौचालयाची इमारत जमिनदोस्त करण्यात आलेली असून याठिकाणी नवीन इमारतीसाठी कामाला गती अजून मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे बायो टॉयलेटवर सद्या ताण पडत आहे. सुलभ शौचालयाचे काम त्वरीत सुरू करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. प्रवाशी बसवाल्यावर अक्षरश: जवळच्या आहोळात जाऊन नैसर्गिक विधी करण्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचे यावेळी कथन केले.

फोंड्यातील व्यापारी, फेरीवाले, फुलविक्रेत्या महिलावर्गाचे हाल

फोंड्यात दोन दिवस भरणाऱ्या आठवडी बाजारात मोठया प्रमाणात ग्राहक भेटी देत असतात. तसेच रस्त्यावरील फेरीवाले व दुकान थाटून बसलेल्या व्यापाऱ्यानाही सुलभ शौचालय बंदावस्थेत असल्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.  फुलांची विक्री करणाऱ्या ज्येष्ठ महिला, तसेच प्रवासी बसच्या प्रतिक्षेत थांबणाऱ्या महिला वर्गाची सुलभ शौचालय बंद असल्याने नामुष्की ओढावलेली आहे. फोंडा शहरात सद्या मुताऱ्यांची व शौचालयाची सोय उपलब्ध करण्यात आज पालीका कमी पडू लागली आहे. फोंडा शहरातील जुने बसस्थानक येथील झरेश्वर परीसरात उघड्यावर नैसर्गिक विधीचे प्रमाण वाढू लागले आहे. उघड्यावर शौचमुक्तीसाठी उपक्रम राबविणाऱ्या पालीकेने फोंड्यातील जुने बसस्थानक परिसरातील सुलभ शौचालयाच्या दुरूस्तीआधी तात्पुरती उपाययोजना करावी अशी मागणी येथील पायलट, प्रवाशी बसचे चालक, कंन्क्टर, फेरीवाले, दुकानदार व महिलावर्गानी केली आहे.एकाचवेळी फोंडा तालुक्यातील सार्वजनिक ठिकाणी असलेली तिन्ही सुलभ शौचालये एकाचवेळी बंदावस्थेत असल्यामुळे नागरिकांनी संताप व्dयाक्त केला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article