महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘आप’चे तिन्ही उमेदवार बिनविरोध राज्यसभेवर जाणार

06:53 AM Jan 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

दिल्लीच्या 3 राज्यसभा जागांवर आम आदमी पक्षाचे उमेदवार स्वाति मालिवाल, संजय सिंह आणि एन.डी. गुप्ता यांची बिनविरोध निवड होणे निश्चित आहे, कारण आप व्यतिरिक्त अन्य कुठल्याही पक्षाच्या उमेदवाराने स्वत:चा अर्ज भरलेला नाही. तर याचा निकाल औपचारिक स्वरुपात ठरलेल्या दिवशी केला जाणारअसल्याची माहिती एका अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली आहे.

Advertisement

राज्यसभा निवडणुकीकरता अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 9 जानेवारी होती. तर सर्व उमेदवारी अर्जांची छाननी 10 जानेवारी रोजी करण्यात आली आहे. आप खासदार संजय सिंह, एन.डी. गुप्ता आणि सुशील कुमार गुप्ता यांचा 6 वर्षांचा कार्यकाळ 27 जानेवारी रोजी संपुष्टात येत आहे. आम आदमी पक्षाने संजय सिंह, एन.डी. गुप्ता यांना दुसऱ्या कार्यकाळासाठी पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर सुशील गुप्ता यांच्याजागी दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष स्वाती मालिवाल यांना संधी देण्यात आली आहे. मालिवाल यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय मानले जाते.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article