महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सर्व आमदारांना मिळणार राज्यचिन्हाचे बॅड्ज

06:22 AM Nov 14, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

राज्यातील सर्व 224 आमदारांना ‘गंडभेरुंड’ हे राज्यचिन्ह असणारे बॅड्ज (बिल्ला) दिले जाणार आहे. सोन्याचा मुलामा असणारे हे बॅड्ज तयार करण्याचे आदेश विधानसभा सचिवालयाने दिले आहेत. हे बॅड्ज बेळगावमध्ये होणाऱ्या अधिवेशनावेळी भेट स्वरुपात वितरण केले जाणार असल्याचे समजते.

Advertisement

राज्याचे ‘कर्नाटक’ नामकरण होऊन 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बिल्ला लावून राज्याला महत्त्व देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बेळगाव येथील सुवर्ण विधानसौधमध्ये होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनापासून सर्व आमदार आणि विधानपरिषद सदस्य डाव्या खांद्याच्या बाजूला बॅड्ज घालतील. याशिवाय आमदार राज्य आणि देशाबाहेर फिरताना सदर बॅड्ज घालण्याची शक्मयता आहे.

अलीकडे परदेशातून निवडून आलेले लोकप्रतिनिधी भेटायला आल्यानंतर त्यांनी त्यांच्या देशाचे बॅड्ज घातले. हे लक्षात घेऊन सभापती यू. टी. खादर यांना ‘गंडभेरुंड’ बॅड्जची कल्पना सुचली. त्यामुळे राज्यातील आमदारांनाही असेच बॅड्ज देण्याचा विचार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. प्रत्येक बॅड्जसाठी सुमारे 2,800 ऊपये खर्च येणार आहे. प्रत्येक आमदाराला तीन बॅड्ज दिले जाणार आहेत. संपूर्ण आमदारांच्या बॅड्जची एकूण किंमत सुमारे 20 लाख ऊपये इतकी होणार असून या प्रस्तावाला वित्त विभागाने सहमती दर्शवल्याचे सूत्रांनी सांगितले. पितळ्यापासून बॅड्ज बनवले जात असून त्यांना सोन्याचा मुलामा दिला जात आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article