For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दहाही खेळाडू रिटायर्ड आऊट

06:45 AM May 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
दहाही खेळाडू रिटायर्ड आऊट
Advertisement

क्रिकेटच्या इतिहासातील पहिलीच घटना, दोन्ही सामन्यात 15 खेळाडू शून्यावर बाद

Advertisement

वृत्तसंस्था/ बँकॉक

महिला टी-20 वर्ल्ड कप आशिया क्वालिफायर 2025 स्पर्धा सध्या थायलंडमध्ये  सुरु असून या स्पर्धेत शनिवारी अनोखी व अभूतपूर्व गोष्ट घडली. या सामन्यात यूएई संघातील सर्व खेळाडू रिटायर्ड आऊट होण्याचा अजब प्रकार घडला.

Advertisement

शनिवारी 10 मे रोजी संयुक्त अरब अमिरात (युएई) विरुद्ध कतार महिला संघाचा सामना झाला. या सामन्यात युएईने 163 धावांनी विजय मिळवला. पण या सामन्यात तब्बल 10 खेळाडू रिटायर्ड आऊट झाले. यासामन्यात युएईच्या महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, युएईकडून कर्णधार इशा रोहित ओझा आणि तीर्था सतीश यांनी सलामीला येत आक्रमक खेळून दीडशतकी भागीदारी केली. इशाने शतकी खेळी केली, तर तीर्थाने अर्धशतक केले. त्यांनी 16 षटकात संघाला नाबाद 192 धावांपर्यंत नेले होते पण पावसाची शक्यता असल्याने सामना लवकर संपविण्यात येणार होता. त्यामुळे इशा आणि तीर्था दोघीही आधी रिटायर्ड आऊट झाल्या. इशाने 55 चेंडूत 113 धावांची खेळी केली, तीर्थाने 42 चेंडूत 74 धावांची खेळी केली. त्यानंतर बाकीच्या 8 खेळाडूंनी मैदानात येऊन एकही चेंडू न खेळता रिटायर्ड आऊट झाल्या. म्हणजेच संपूर्ण संघ रिटायर्ड आऊट झाला. त्यामुळे संघाचा धावफलक 16 षटकात सर्वबाद 192 धावा असा दिसत होता. इतर 8 खेळाडू शून्यावर बाद होत्या. त्यामुळे असे पहिल्यांदाच झाले की महिला किंवा पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन किंवा त्यापेक्षा अधिक खेळाडू रिटायर्ड आऊट झाले आहेत.

प्रत्युत्तरात युएई संघाने गोलंदाजीही चांगली करताना कतार संघाला 11.1 षटकातच 29 धावांवर सर्वबाद केले. त्यांच्याकडून यष्टीरक्षक फलंदाज रिझफा एम्युनल हिलाच 20 धावांची खेळी करता आली. त्याशिवाय अँजेलिन मेरने 5 आणि शाहरिन बहाद्दरने 2 धावा केल्या. या तिघींशिवाय कतारच्या इतर 7 खेळाडू शून्यावर बाद झाल्या. युएईकडून मिशेल बोथाने सर्वाधिक 3, केटी थॉम्पसनने 2 विकेट्स घेतल्या. हिना होतचंदानी, कर्णधार इशा ओझा, इंदुजा नंदकुमार आणि वैष्णवी महेश यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

15 खेळाडू शून्यावर  बाद

तथापि, दोन्ही संघांच्या मिळून 15 खेळाडू शून्यावर बाद झाल्या. त्यामुळे एकाच आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात 15 खेळाडू शून्यावर बाद होण्याची ही पहिलीच वेळ ठरली. या स्पर्धेत 9 संघ सहभागी झाले असून युएईने पहिले दोन्ही सामने जिंकून अव्वल क्रमांक मिळवलेला आहे. थायलंड आणि नेपाळ संघातील सामना पावसामुळे रद्द झाल्याने ते 3-3 गुणांसह दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

Advertisement
Tags :

.