राज्यात एनडीएचे सर्व उमेदवार विजयी होतील!
कर्नाटकमधील लोकसभा निवडणुकीत भाजप-जेडीएस युतीचे (एनडीए) उमेदवार सर्व 28 जागा जिंकतील. बी. वाय. राघवेंद्र 3 लाखांपेक्षा जास्त मतांनी विजयी होतील, असा विश्वास माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी व्यक्त केला. शिमोगा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार बी. वाय. राघवेंद्र यांच्या उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. घरोघरी जाऊन प्रत्येकांना पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या लोकाभिमुख योजनांची सविस्तर माहिती द्यावी. राघवेंद्र यांना 3 लाखांहून अधिक मतांनी विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई म्हणाले, राज्यात दोन शेतकऱ्यांची ताकद एकत्र आली आहे. त्यामुळे पैशाची ताकद यापुढे काही नाही. काँग्रेसने नवी गॅरंटी आणली आहे. मात्र, त्यांनी सत्ता गाजवण्यासाठी पुरेशा जागा लढवलेल्या नाहीत. 35 गुणांचे पुरेसे प्रश्न न सोडवलेला काँग्रेस पक्ष पास होऊ शकतो का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. काँग्रेस हा अपयशी आणि फसवणूक करणारा पक्ष आहे. कोविडदरम्यान 130 कोटी लोकांचे जीव वाचवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानण्यासाठी भाजपला मत द्या, अशी मागणीही त्यांनी केली.