महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सहकारातून सर्वच स्तरांचा विकास साधता येईल !

10:28 AM Jul 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आमदार विठ्ठल हलगेकर : खानापुरात मराठा बँकेच्या नव्या शाखेचे उद्घाटन

Advertisement

खानापूर : समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वच स्तरात सहकार्याची गरज आहे. यासाठी सहकारातून विकास साधण्यासाठी सहकार क्षेत्रात बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचा आर्थिक स्थर उंचावण्यासाठी पारदर्शकपणे काम करणे गरजेचे आहे. सहकारक्षेत्रात अनेक बदल झाले आहेत. मात्र आजही सहकारक्षेत्राच्या माध्यमातून विकास साधता येतो. यासाठी मराठा बँकेने खानापूर येथे शाखा सुरू करून आपल्या बँकेचा विस्तार केला आहे. बँकेच्या माध्यमातून निश्चितच तालुक्यातील अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे, असे उद्गार आमदार विठ्ठल हलगेकर यांनी मराठा को-ऑप. बँकेच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन दिगंबर पवार होते. संचालक बाळासाहेब काकतकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून बँकेच्या वाटचालीचा आढावा घेतला.

Advertisement

सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर बँकेचे उद्घाटन विभागीय निबंधक डॉ. सुरेश गावडा यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर काऊंटरचे उद्घाटन आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले, तालुक्यात अजूनही सहकारक्षेत्राला मोठा वाव असून फक्त आर्थिक देवाणघेवाण न करता इतर क्षेत्रातही सहकाराच्या माध्यमातून मराठा बँकेने आपला ठसा उमटवावा. तसेच तालुक्यातील उद्योग व्यवसायाना चालना देण्यासाठी योग्य नियोजन करून कर्जवाटप करण्यात यावे.

यावेळी विभागीय निबंधक डॉ. सुरेश गावडा म्हणाले, मराठा बँकेला 82 वर्षांची परंपरा आहे. बँकेने प्रगतीची अनेक शिखरे गाठावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. काळानुसार बदल करून ग्राहकांना सेवा देणे गरजेचे आहे. आज बँका घरापर्यंत पोहोचलेल्या आहेत. त्यामुळे मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. यासाठी ग्राहकांना वेळेवर सेवा देऊन त्यांचा विश्वास संपादन करून बँकेने शेड्युल बँकेत रुपांतर करण्यासाठी प्रयत्न करावेत, यासाठी संचालक मंडळाने कष्ट घेणे गरजेचे आहे. राज्यात शेड्युल बँक म्हणून लवकरच रुपांतर व्हावे, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. यावेळी अरविंद पाटील म्हणाले, मराठा बँक यापूर्वीच खानापुरात येणे गरजेचे होते. बेळगावात बँक असतानादेखील खानापूर तालुक्यातील नागरिकांचे व्यवहार बेळगाव येथील बँकेत होते. बँकेची विश्वासार्हता गेल्या 80 वर्षांपासून टिकून असल्याने खानापूर तालुक्यात या बँकेचा लवकरच विस्तार होण्यास वेळ लागणार नाही.

दिगंबर पाटील म्हणाले, शामराव देसाई यांनी या बँकेची सुरुवात केली होती. मात्र आज मराठा बँकेचा वटवृक्ष झाला आहे. या बँकेच्या माध्यमातून बहुजन समाजाला आर्थिक पाठबळ मिळालेले आहे. त्यामुळे बहुजन समाजातील अनेकांनी प्रगती साधलेली आहे. तालुक्यात बँकेची निश्चित भरभराट होईल. अध्यक्षीय भाषणात दिगंबर पवार म्हणाले, विश्वासार्हतेची परंपरा निश्चित जपली जाईल आणि संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून बँकेच्या प्रगतीसाठी निश्चित प्रयत्न केले जातील, मराठा बँकेकडून ग्राहकांना पारदर्शक व्यवहार आणि सुविधांची हमी आम्ही देत आहोत. तालुक्यातील बहुजन समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी आम्ही निश्चित प्रयत्नशील राहू, असे ते म्हणाले.

यावेळी बँकेचे संचालक विनोद हंगीरकर, सुनील अष्टेकर, मोहन चौगुले, लक्ष्मण नाईक, शेखर हंडे, बाळासाहेब काकतकर, लक्ष्मण होनगेकर, बाळाराम पाटील, बी. एस. पाटील,  मुरलीधर पाटील, प्रकाश चव्हाण, अजित पाटील, शामराव पाटील, ईश्वर घाडी, प्रकाश निलजकर, विनायक सावंत, धनंजय देसाई उपस्थित होते. यावेळी उपस्थितांचे बँकेच्यावतीने भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी सभासद, हितचिंतक, भागधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article