महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

इगोर स्टिमॅच यांची हकालपट्टी

06:18 AM Jun 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारतीय फुटबॉल संघाचे प्रमुख प्रशिक्षक इगोर स्टिमॅच यांची प्रमुख प्रशिक्षकपदावरुन हकालपट्टी करण्याचा निर्णय अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने घेतला आहे. 2026 सालातील फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल पात्र फेरी स्पर्धेतील मोहिमेत भारताची कामगिरी निराशाजनक झाल्याने स्टिमॅच यांची प्रमुख प्रशिक्षक पदावरुन उचलबांगडी करण्यात आली आहे. 2019 साली भारतीय फुटबॉल संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी स्टिमॅच यांची नियुक्ती करण्यात आली होती. गतवर्षी त्यांना एक वर्षाच्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आली. विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठीच्या पात्र फेरी स्पर्धेत भारताला तिसरी फेरी गाठता आली नाही. दुसऱ्या फेरीतील सामन्यात कतारने भारताचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला होता. 1998 च्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणाऱ्या क्रोएशियन फुटबॉल संघामध्ये 56 वर्षीय इगोर स्टिमॅच यांचा समावेश होता. 2019 साली प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भारतीय फुटबॉल संघाने चार प्रमुख फुटबॉल स्पर्धा जिंकल्या. भारतीय फुटबॉल संघाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वेळा सॅफ चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा, एकदा इंटरकाँटिनंटल चषक स्पर्धा आणि एकदा तिरंगी फुटबॉल स्पर्धा जिंकली.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article