For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पर्पल फेस्तमध्ये अखिल भारतीय वधू-वर मेळावा

11:52 AM Dec 08, 2023 IST | Tarun Bharat Portal
पर्पल फेस्तमध्ये अखिल भारतीय वधू वर मेळावा
Advertisement

समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांची माहिती

Advertisement

पणजी : जानेवारी महिन्यात होणाऱ्या पर्पल फेस्ताचाच एक भाग म्हणून 10 जानेवारी रोजी अखिल भारतीय वधू वर मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली. विविध प्रकारच्या दिव्यांगाना मनपसंत जोडीदार शोधता यावा यासाठी हा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. पर्वरी येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला मंत्री फळदेसाई, राज्य दिव्यांगजन खात्याचे आयुक्त गुऊप्रसाद पावसकर, हॉइस व्हिजनच्या संस्थापक सुश्मीता बुबना उपस्थित होत्या. गुऊप्रसाद पावसकर यांनी सांगितले की, अखिल भारतीय वधू-वर मेळावा हा राज्य सरकारचे समाज कल्याण खाते, दिव्यांगजन आयोग, केंद्रीय दिव्यांगजन सशक्तीकरण खाते, व्हॉइस व्हिजन आणि बासुदेव बुबना मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. अखिल भारतीय वधू वर मेळाव्याच्या नोंदणीसाठी https://purplefest.goa.gov.in/ व यावर नोंदणी करावी, असे आयोजकांनी कळविले आहे.  हा मेळावासर्व पुऊष, स्त्रिया, धर्म, जाती, समूह, दिव्यांग आणि दिव्यांग नसलेली व्यक्ती भारतातील सर्वांसाठी हा मेळावा खुला आहे प्रत्येक सहभागीसाठी नोंदणी शुल्क 500 ऊपये आकारण्यात येणार आहे. नोंदणीची शेवटची तारीख 20 डिसेंबर आहे. अर्ज भरून, नोंदणी शुल्क  आणि आवश्यक ते दस्तऐवज सादर केल्यावरच नोंदणी प्रक्रिया पूर्ण मानले जाईल, असे आयोजकांतर्फे सांगण्यात आले.

Advertisement
Advertisement
Tags :

.