महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीसाठी चारही संघांची घोषणा

06:39 AM Sep 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारत अ संघाचे कर्णधारपद  अगरवालकडे : रिंकू सिंगचा भारत ब संघात समावेश : संजू सॅमसन भारत ड कडून खेळणार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीसाठी निवड समितीने संघात काही बदल केले आहेत. दुसऱ्या फेरीला 12 सप्टेंबरपासून अनंतपूर येथे सुरुवात होणार आहे. भारत अ संघाचा कर्णधार शुभमन गिल, केएल राहुल, ध्रुव जुरेल, कुलदीप यादव आणि आकाशदीप यांची बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियात निवड करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत हे सर्व खेळाडू दुलीप ट्रॉफीच्या दुस्रया फेरीत सहभागी होऊ शकणार नाहीत. भारत अ, भारत ब आणि भारत ड मध्ये बदल करण्यात आले आहेत, तर भारत क मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

भारत अ संघाचा कर्णधार शुभमन गिल, केएल राहुल, ध्रुव जुरेल, कुलदीप यादव आणि आकाश दीप हे संघातून बाहेर पडले आहेत. या चौघांची टीम इंडियात निवड झाल्याने दुलीप ट्रॉफीतील दुसऱ्या सामन्यात खेळू शकणार नाहीत. निवडकर्त्यांनी गिलच्या जागी प्रथम सिंग (रेल्वे), केएल राहुलच्या जागी अक्षय वाडकर (विदर्भ सीए) आणि ध्रुव जुरेलच्या जागी एसके रशीद (आंध्र सीए) यांचा समावेश केला आहे. याशिवाय फिरकीपटू शम्स मुलानी कुलदीप यादवच्या जागी अ संघात आला आहे. तर आकाशदीपच्या जागी आकिब खान (उत्तर प्रदेश) संघाचा भाग असेल. अनुभवी मयंक अगरवालकडे भारत अ संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

भारत ब संघातही बदल

बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी भारत ब कडून ऋषभ पंत, यशस्वी जैस्वाल, सरफराज खान आणि यश दयाल यांचा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे. पंत आणि जैस्वाल यांच्या जागी सुयश प्रभुदेसाई आणि रिंकू सिंग यांना संघात आणण्यात आले आहे. सरफराज खान दुसऱ्या फेरीसाठी उपलब्ध असेल.

भारत ड संघातही बदलाचे वारे, क संघ जैसेथे

भारत ‘क’ संघामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ज्याचे नेतृत्त्व ऋतुराज गायकवाड करत आहे. अक्षर पटेल इंडिया ‘डी‘ मधून भारतीय संघात सामील होईल आणि त्याच्या जागी निशांत सिद्धू इंडिया ‘डी‘ मध्ये सामील होईल. तुषार देशपांडे दुखापतीमुळे दुसऱ्या फेरीत खेळू शकणार नाही.

दुलीप ट्रॉफीसाठी संघ पुढीलप्रमाणे -

भारत अ संघ : मयंक अगरवाल (कर्णधार), रेयान पराग, तिलक वर्मा, शिवम दुबे, तनुष कोटियन, प्रसिध कृष्णा, खलील अहमद, आवेश खान, कुमार कुशाग्रा, शास्वत रावत, प्रथम सिंग, अक्षय वाडकर, एसके रशीद, शम्स मुलाणी, आकिब खान.

भारत ब संघ : अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), सरफराज खान, मुशीर खान, नितीश कुमार रे•ाr, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, मुकेश कुमार, राहुल चहर, आर साई किशोर, मोहित अवस्थी, एन जगदीशन, सुयश प्रभुदेसाई, रिंकू सिंग, हिमांशू मंत्री.

भारत क संघ - ऋतुराज गायकवाड (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, अभिषेक पोरेल, बाबा इंद्रजीत, हृतिक शौकीन, मानव सुथार, गौरव यादव, विजयकुमार विशाक, अंशुल कंबोज, मयंक मार्कंडे, हिमांशू वारकर, संदीप जुयाल.

भारत ड संघ - श्रेयस अय्यर (कर्णधार), अथर्व तायडे, यश दुबे, देवदत्त पडिक्कल, रिकी भुई, सरांश जैन, अर्शदीप सिंग, आदित्य ठाकरे, हर्षित राणा, आकाश सेनगुप्ता, केएस भरत, सौरभ कुमार, संजू सॅमसन, निशांत सिंधू, विद्वथ कवेरप्पा

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article