For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘ऑल इंग्लंड’ बॅडमिंटन आजपासून, सात्विक-चिरागवर सर्वाधिक आशा

06:45 AM Mar 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘ऑल इंग्लंड’ बॅडमिंटन आजपासून  सात्विक चिरागवर सर्वाधिक आशा
Advertisement

वृत्तसंस्था/ बर्मिंगहॅम

Advertisement

बॅडमिंटनमधील प्रतिष्ठित ऑल इंग्लंड स्पर्धा आज मंगळवारपासून सुरू होत असून फ्रेंच ओपनमधील विजेते सात्विकसाईराज रान्कीरे•ाr आणि चिराग शेट्टी यांच्याकडून या स्पर्धेतील जेतेपदाच्या बाबतीत भारताला मागील 23 वर्षांपासून भेडसावणारा दुष्काळ संपुष्टात आणण्याच्या आशा उंचावल्या आहेत. या स्पर्धेतील भारताच्या आव्हानाचे अधिपत्य सध्या तेच करत आहेत.

प्रकाश पदुकोन (1980) आणि पुलेला गोपीचंद (2001) हे विजेतेपद मिळवणारे शेवटचे भारतीय बॅडमिंटनपटू होते आणि सायना नेहवाल (2015) व लक्ष्य सेन (2022) हे त्याच्याजवळ पोहाचून शेवटी त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानवे लागले होते. या स्पर्धेला भारताच्या दृष्टीने खास दर्जा आहे परंतु गेल्या काही वर्षांमध्ये त्याचे वैशिष्ट्या काहीसे कमी झाले आहे. कारण ही स्पर्धा आता आंतरराष्ट्रीय कॅलेंडरमधील चार सुपर 1000 स्पर्धांपैकी एक बनली आहे.

Advertisement

सात्विक आणि चिराग यांनी इंडोनेशियामध्ये गेल्या वर्षी ‘सुपर 1000’ स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले आहे आणि या मोसमातील त्यांची उत्कृष्ट वाटचाल पाहता तसेच रविवारी रात्री पॅरिस येथे बजावलेल्या पराक्रमामुळे त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील. आशियाई क्रीडास्पर्धेतील विजेत्या सात्विक आणि चिराग यांनी या हंगामात त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजविताना ‘मलेशिया सुपर 1000’ आणि ‘इंडिया सुपर 750’सह तीन स्पर्धांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आणि त्यानंतर पॅरिस येथे जेतेपद पटकावण्यात यश मिळविले. त्यामुळे ऑल इंग्लंडमधील विजेतेपदाच्या बाबतीत भारताला सर्वांत जास्त आशा त्यांच्याकडून असतील.

सुऊवातीच्या फेरीत त्यांच्यासमोर इंडोनेशियाची अनुभवी जोडी, तीन वेळचे विश्वविजेते मोहम्मद अहसान व हेंद्रा सेटियावान हे असतील. त्यांनी भूतकाळात अनेक वेळा भारतीय जोडीला सतावलेले आहे. गेल्या वर्षी फ्रेंच ओपनमध्ये सात्विक आणि चिराग यांचा त्यांच्याशी शेवटच्या वेळी सामना झाला असता इंडोनेशियन जोडीने त्यांना पराभूत केले होते. भारतीय जोडी आता त्याचा वचपा काढू पाहणार आहे. जर त्यांनी सुऊवातीचा अडथळा पार केला, तर भारतीय जोडीचा सामना मलेशियन जोडी अॅरोन चिया आणि सोह वुई यिक यांच्याशी होण्याची शक्यता आहे. सदर जोडी त्यांच्यासाठी घातक ठरलेली असली, तरी गेल्या तीन सामन्यांमध्ये भारतीयांनी त्यांना पराभूत केलेले आहे.

पी. व्ही. सिंधूचा जर्मनीच्या यवोने लीशी प्रथम सामना होणार असून त्यानंतर अव्वल मानांकित आणि जागतिक क्रमवारीतील पहिल्या स्थानावरील खेळाडू कोरियाची अॅन से यंग हिचा तिला मुकाबला करावा लागणार आहे. गेल्या आठवड्यात फ्रेंच ओपनमध्ये उपांत्य फेरी गाठलेल्या लक्ष्य सेनचा सामना सुरुवातीच्या लढतीत मलेशियाच्या एनजी त्झे योंगशी होणार असून दुसऱ्या फेरीत चौथ्या मानांकित डेन अँडर्स अँटोनसेनशी त्याला भिडावे लागण्याची शक्यता आहे. एच. एस. प्रणॉयची गाठ पहिल्या फेरीत चिनी तैपेईच्या सु ली यांगशी पडणार असून किदाम्बी श्रीकांतला मात्र पहिल्याच फेरीत अव्वल मानांकित आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या व्हिक्टर एक्सेलसेनचा सामना करावा लागणार आहे.

Advertisement

.