For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव मतदारसंघातील सर्व अर्ज वैध

06:03 AM Apr 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव मतदारसंघातील सर्व अर्ज वैध
Advertisement

अर्ज मागे घेण्यासाठी उद्या अखेरचा दिवस

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

राज्यात 7 मे रोजी होणाऱ्या दुसऱ्या टप्प्याच्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया शुक्रवारी संपली होती. शनिवारी अर्जांची छाननी करण्यात आली. बेळगाव आणि चिकोडी लोकसभा मतदारसंघातून दाखल झालेले सर्व उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. 22 एप्रिल अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असून त्या दिवशी सायंकाळी लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Advertisement

बेळगाव मतदारसंघातून 21 उमेदवारांनी 30 अर्ज दाखल केले होते. तर चिकोडीतून 20 उमेदवारांनी 27 अर्ज दाखल केले होते. दोन्ही लोकसभा मतदारसंघातील एकही अर्ज अवैध ठरलेला नाही.

दुसरा टप्पा : 14 मतदारसंघातील 109 अर्ज अवैध

राज्यातील दुसऱ्या टप्प्यात उत्तर कर्नाटकातील बेळगाव, चिकोडी, बागलकोट, कलबुर्गी, विजापूर, रायचूर, बिदर, कोप्पळ, बळ्ळारी, हावेरी, धारवाड, कारवार, दावणगेरे, शिमोगा या 14 मतदारसंघांमध्ये निवडणूक होणार आहे. येथे 335 उमेदवारांनी 503 अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 109 अर्ज अवैध ठरले आहेत. म्हणजेच 394 अर्ज वैध ठरले असून 272 उमेदवार निवडणूक लढविण्यासाठी पात्र ठरले आहेत. त्यापैकी कितीजण माघार घेतात, हे सोमवारी स्पष्ट होणार आहे.

सुरपूर पोटनिवडणुकीसाठी सर्व अर्ज वैध

यादगिरी जिल्ह्यातील सुरपूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार राजा वेंकटप्पा नायक यांच्या निधनामुळे सुरपूरमध्ये 7 मे रोजी पोटनिवडणूक होणार आहे. येथे 7 उमेदवारांनी 13 अर्ज दाखल केले होते. येथील सर्व अर्ज वैध ठरले आहेत.

Advertisement
Tags :

.