For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुरिंदर चड्ढांसोबत काम करणार आलिया

06:24 AM May 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
गुरिंदर चड्ढांसोबत काम करणार आलिया
Advertisement

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिने चाहत्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. केवळ देशातच नव्हे तर विदेशातच तिचे चाहते आहेत. आलिया आता लवकरच दिग्दर्शिका गुरिंदर चड्ढा यांच्या चित्रपटात दिसून येणार आहे.

Advertisement

आलिया भट्ट या चित्रपटात अनोखी भूमिका साकारणार आहे. चित्रपटात आलिया राजकन्येच्या भूमिकेत दिसून येणार आहे. गुरिंदर चड्ढा यांना ‘बेंट इट लाइक बेकहॅम’, ‘ब्राइड अँड प्रेज्युडिस’ यासारख्या गाजलेल्या चित्रपटांसाठी ओळखले जाते.

गुरिंदर स्वत:च्या आगामी चित्रपटात भारतीय राजकन्येची कहाणी डिस्नेसोबत साकारणार आहेत. या चित्रपटाच्या कहाणीसाठी आलिया आणि गुरिंदर यांच्यात अनेकदा चर्चा झाली आहे. पटकथेला अंतिम स्वरुप दिल्यावर उर्वरित कलाकारांची निवड होणार आहे. पुढील वर्षी या चित्रपटाचे चित्रिकरण होणार असल्याचे मानले जात आहे.

Advertisement

आलियाने अलिकडेच स्वत:च्या प्रॉडक्शन हाउसचा चित्रपट ‘जिगरा’चे चित्रिकरण पूर्ण केले आहे. हा चित्रपट सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित होऊ शकतो. आलिया लवकरच पती तसेच अभिनेता रणवीर कपूर आणि विक्की कौशलसोबत लव्ह अँड वॉर या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू करणार आहे. याचबरोबर वायआरएफच्या एका स्पाय थ्रिलर चित्रपटात ती मुख्य भूमिका साकारणार आहे.

Advertisement
Tags :

.