महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आलेक्स सिक्वेरा यांना तीन खाती मिळणार

12:17 PM Nov 22, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे अनेक मंत्र्यांचे लक्ष

Advertisement

पणजी : प्राप्त माहितीनुसार नव्याने शपथबद्ध झालेले आलेक्स सिक्वेरा यांच्याकडे कायदा तसेच विधिमंडळ कामकाज आणि पर्यावरण ही खाती जाण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम खाते तूर्तास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडेच राहण्याची शक्यता आहे. आलेक्स सिक्वेरा हे मंत्री झाले. परंतु त्यांना अद्याप कोणतीही खाती देण्यात आलेली नाहीत. सोमवारी इफ्फीच्या गडबडीत दिवस गेला. मंगळवारी इफ्फीसह अनेक बैठकांमध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व्यस्त होते. आज सायंकाळी मुख्यमंत्री तेलंगणात प्रचारासाठी जात आहेत. त्यामुळे ते येथून जाण्यापूर्वी आलेक्स सिक्वेरा यांना देण्यात यावयाच्या खात्यांबाबत अधिसूचना जारी होईल. त्यामुळे इतर मंत्र्यांच्या खात्यांमध्ये तूर्तास बदल होणार नाही, असे भाजपमधील एका सूत्राने सांगितले.

Advertisement

आलेक्स सिक्वेरा हे काही नीलेश काब्राल यांची जागा घेऊ शकत नाहीत. काब्राल हे दिवसाचे आठ ते दहा तास काम करीत होते. आलेक्स सिक्वेरा यांचे आता वय झालेले आहे. वयोपरत्वे त्यांना सार्वजनिक बांधकाम खात्याचा कारभार हाताळणे शक्य होणार नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याचा उत्तम अनुभव हा सुदिन ढवळीकर यांना आहे. मात्र ढवळीकर हे भाजपचे नाहीत. कालांतराने भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचा या खात्यासाठी विचार होऊ शकतो. अर्थात लोकसभा निवडणुकीपूर्वी हे शक्य होणार नाही. त्यामुळे तूर्तास हे महत्त्वाचे खाते मुख्यमंत्र्यांकडे रहाण्याचीच जास्त शक्यता आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आज सिक्वेरा यांना तीन खाती देण्याची शक्यता आहे. सध्या इतर अनेक मंत्री हे मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे नजर लावून आहेत. सर्वांची खाती बदलली जाणार तर नाही ना ? यावर सध्या मंत्र्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article