कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर देशभरात अलर्ट

06:33 AM May 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

200 हून अधिक उड्डाणे रद्द : 18 विमानतळे संचालनासाठी तात्पुरत स्वरुपात बंद

Advertisement

भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर पार पाडल्यावर पाकिस्तान भेदरला आहे. तर पाकिस्तानकडून प्रत्युत्तरादाखल आगळीक होण्याची शक्यता पाहता देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. याचमुळे उत्तर आणि पश्चिम भारतातील कमीतकमी 18 विमानतळांना तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आले आहे. या विमानतळांमध्ये श्रीनगर, जम्मू, लेह, अमृतसर, पठाणकोट, चंदीगड, जोधपूर, जैसलमेर, शिमला, धर्मशाळा आणि जामनगर सामील आहे.

Advertisement

200 हून अधिक उड्डाणे रद्द

ऑपरेशन सिंदूर नंतर फ्लाइट ऑपरेशन्सवर मोठा प्रभाव पडला आहे. आतापर्यंत 200 हून अधिक उ•ाणे रद्द झाली आहेत. केवळ इंडिगोनेच जवळपास 165 विमानो•ाणे रद्द केली आहेत. दिल्ली विमानतळावरही 35 हून अधिक फ्लाइट्स (23 डिपार्चर, 8 अराइव्हल आणि 4 इंटरनॅशनल फ्लाइट्स) रद्द करण्यात आल्या आहेत. वर्तमान स्थिती पाहता इंडिगो एअरलाइनने श्रीनगर, जम्मू, अमृतसर, लेह, चंदीगड, धर्मशाळा, बिकानेर आणि जोधपूरसाठी सर्व उ•ाणे रद्द केली आहेत. याची माहिती देत एअरलाइनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केलीआहे. विमानतळावर जाण्यापूर्वी फ्लाइटची स्थिती तपासून पहा असा सल्ला इंडिगोने प्रवाशांना दिला आहे.

कतार एअरवेजने उचलले पाऊल

पाकिस्तानी हवाईक्षेत्र बंद करण्यात आल्याने कतार एअरवेजने पाकिस्तानसाठीची उ•ाणे तात्पुरत्या स्वरुपात रोखली आहेत. आणखी अनेक देशांनी देखील अशाच प्रकारचे पाऊल उचलले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article