अल्कारेझ, सित्सिपस तिसऱ्या फेरीत
वृत्तसंस्था/ पॅरिस
स्पेनच्या कार्लोस अल्कारेझ व ग्रीसच्या स्टेफानोस सित्सिपस यांनी येथे सुरू असलेल्या एटीपी 1000 पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धेची तिसरी फेरी गाठली.
दुसरे मानांकन असलेल्या अल्कारेझने जेरीवर 7-5, 6-1 अशी मात केली. त्याची पुढील लढत युगो हम्बर्ट किंवा मार्कोस गिरोन यापैकी एकाशी होईल. दहाव्या मानांकित सित्सिपसने अलेजांद्रो ताबिलोचा 6-3, 6-4 असा पराभव करून एटीपी फायनल्समध्ये स्थान मिळविण्याच्या आशा वाढवल्या. अन्य सामन्यात सातव्या मानांकिन कॅस्पर रुडने चांगली सुरुवात केली, मात्र त्याला हा जोम अखेरपर्यंत टिकविता आला नाही. त्याला बिगरमानांकित ऑस्ट्रेलियाच्या जॉर्डन थॉम्पसनने 7-6 (7-3), 3-6, 6-4 असे हरविले.
दुसऱ्या फेरीच्या अन्य एका सामन्यात सहाव्या मानांकित आंद्रे रुबलेव्हलाही पराभवाचा धक्का बसला. त्याला फ्रान्सिस्को सेरुंडोलोकडून 7-6 (8-6), 7-6 (7-5) असा पराभव स्वीकारावा लागला. जेनिक सिनरने सोमवारी या स्पर्धेतून तब्बेतीच्या कारणास्तव माघार घेतली.
पहिल्या फेरीच्या राहिलेल्या सामन्यात होल्गर रुनेने मॅटेव अरनाल्डीवर 6-4, 6-4, नवव्या मानांकित अॅलेक्स डी मिनॉरने मारियानो नाव्होनवर 7-5, 7-1, अॅलेक्स मिचेल्सेनने 12 वा मानांकित ह्युबर्ट हुरकाझवर 6-1, 6-3, जॅक ड्रेपरने जिरी लेहेकावर 7-5, 6-2, बेन शेल्टनने कोरेन्टिन मुटेटवर 6-3, 6-7 (10-8), 6-3, फ्रान्सच्या एम्पेत्शी पेरिकार्डने 28 बिनतोड सर्व्हिस करीत फ्रान्सेस टायफोवर 6-7 (5-7), 7-6 (7-4), 6-3, फ्रान्सच्या आर्थर फिल्सने क्रोएशियाच्या मारिन सिलिकवर 7-6 (7-5), 6-4 अशी मात करीत दुसरी फेरी गाठली.