For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अल्कारेझ, साबालेन्का, राडुकानू, स्विटोलिना दुसऱ्या फेरीत

06:27 AM Jul 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
अल्कारेझ  साबालेन्का  राडुकानू  स्विटोलिना दुसऱ्या फेरीत
Advertisement

वृत्तसंस्था/ लंडन

Advertisement

दोन वेळचा डिफेंडिंग चॅम्पियन कार्लोस अल्कारेझला विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेची दुसऱ्या फेरी गाठण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सात मानांकित खेळाडूंचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले. त्यात मॅटेव बेरेटिनी, आठवा मानांकित होल्गर रुने, नववा मानांकित डॅनील मेदवेदेव्हृ 16 वा मानांकित फ्रान्सिस्को सेरुंडोलो, 20 वा मानांकित अॅलेक्सी पॉपीरिन, 24 वा मानांकित स्टेफानोस सित्सिपस, 31 वा मानांकित टॅलन ग्रीकस्पूर, 20 वी मानांकित एलेना ओस्टापेन्को, तिसरी मानांकित जेसिका पेगुला यांचा समावेश आहे. आर्यना साबालेन्का, मॅडिसन कीज, इलेना स्विटोलिना मर्केटा व्होन्ड्रोसोव्हा, एम्मा राडुकानू यांनी मात्र विजयी सलामी दिली.

कार्लोस अल्कारेझला 38 वर्षीय फॅबिओ फॉगनेनीने पाच सेट्स झुंजवले. साडेचार तास रंगलेली ही झुंज अल्कारेझने 7-5, 6-7 (5-7), 7-5, 2-6, 6-1 अशी जिंकत दुसरी फेरी गाठली. प्रेंच ओपनच्या अंतिम फेरीतही अल्कारेझला साडेपाच तास जेनिक सिनरने झुंजवले होते. अल्कारेझची पुढील लढत 21 वर्षीय ब्रिटनच्या ऑलिव्हर तार्वेटशी होईल. नवव्या मानांकित रशियाच्या मेदवेदेव्ह आणखी एका ग्रँडस्लॅममधून पहिल्याच फेरीत बाहेर पडला. 64 व्या मानांकित बेंजामिन बॉन्झीने त्याला 7-6 (7-2), 3-6, 7-6 (7-3), 6-2 असे हरविले. दोन वर्षांपूर्वीही त्याला या स्पर्धेत पहिल्या फेरीत पराभव स्वीकारावा लागला होता. अग्रमानांकित जेनिक सिनरने एल. नार्डीचा 6-4, 6-3, 6-0 असास पराभव केला तर एन. जॅरीने होल्गर रुनेचे आव्हान 4-6, 4-6, 7-5, 6-3, 6-4 असे संपुष्टात आणले आणि सित्सिपसने व्हॅलेन्टिन रॉयरने 6-2, 6-2 असे दोन जिंकून आघाडी घेतल्यानंतर सित्सिपसने माघार घेतली.

Advertisement

महिला एकेरीत तिसऱ्या मानांकित जेसिका पेगुलाला पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. इटलीच्या 116 व्या मानांकित एलिजाबेत कॉक्सियारेटोने 6-2, 6-3 असे तिला हरवित स्पर्धेबाहेर घालविले. गेल्या पाच वर्षात ग्रँडस्लॅममधून इतक्या लवकर बाहेर पडण्याची तिची ही पहिलीच वेळ आहे. जर्मनीत झालेल्या बॅड होम्बर्ग ओपन स्पर्धेचे जेतेपद मिळवित ती येथे दाखल झाली होती. यापूर्वी 2020 मध्ये ती प्रेंच ओपन स्पर्धेत पहिल्या फेरीत पराभूत झाली होती.

जेबॉरची माघार

दोन वेळा या स्पर्धेचे उपविजेतेपद मिळविलेल्या ऑन्स जेबॉरने श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने व्हिक्टोरिया टोमोव्हाविरुद्ध खेळताना दुसऱ्या सेटमधून माघार घेतली. पहिला सेट टायब्रेकरमध्ये तिने 7-6 (7-5) असा जिंकला होता आणि दुसऱ्या सेटमध्ये ती 2-0 अशी आघाडीवर होती. 2022 च्या अंतिम फेरीत ती रायबाकिनाकडून तर 2023 च्या अंतिम फेरीत ती व्होन्ड्रोसोव्हाकडून पराभूत झाली होती. मागील वर्षीची उपविजेत्या इटलीच्या जस्मिन पाओलिनीने एका सेटची पिछाडी भरून काढत लॅटव्हियाच्या अॅनास्तेशिया सेवास्तोव्हाचा 2-6, 6-3, 6-2 असा पराभव केला. अग्रमानांकित आर्यना साबालेन्काने दुसरी फेरी गाठताना कॅनडाच्या पात्रता फेरीतून आलेल्या कार्सन ब्रॅन्टाईनवर 6-1, 7-5 अशी मात केली. ब्रिटनच्या केटी बोल्टरने दुसरी फेरी गाठताना नवव्या मानांकित स्पेनच्या पॉला बेडोसाचे आव्हान 6-2, 3-6, 6-4 असे संपुष्टात आणले. ब्रिटनच्या एकूण सात खेळाडूंनी दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले. त्यांची अव्वल टेनिसपटू एम्मा राडुकानूने वेल्शच्या 17 वर्षीय मिमी झू हिच्यावर 6-3, 6-3 अशी मात केली.

ब्रिटनची आणखी एक खेळाडू सोने कार्टलने माजी फ्रेंच चॅम्पियन एलेना ओस्टापेन्कोला 7-5, 2-6, 6-2 असा पराभवाचा धक्का दिला. अन्य सामन्यात एलीस मर्टेन्सने फ्रुहव्हर्टोव्हाचा 6-4, 6-2, अॅनास्तेशिया पावलुचेन्कोव्हाने अॅला टोमलानोविचचा 4-6, 6-3, 6-2, सहाव्या मानांकित नाओमी ओसाकाने टी. गिब्सनचा 6-4, 7-6 (7-4), सहाव्या मानांकित मॅडिसन कीजने इलेना रुसचा 6-7 (4-7), 7-5, 7-5 इलिना स्विटोलिनाने ए. बाँडरचा 6-3, 6-1, व्होन्ड्रोसोव्हाने केसलरचा 6-1, 7-6 (7-3) असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.

Advertisement
Tags :

.