For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अॅल्कारेझ, साबालेंका उपउपांत्यपूर्व फेरीत

06:38 AM Apr 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
अॅल्कारेझ  साबालेंका उपउपांत्यपूर्व फेरीत
Advertisement

वृत्तसंस्था/ माद्रीद

Advertisement

येथे सुरु असलेल्या एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील माद्रीद खुल्या पुरूष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनचा कार्लोस अल्कारेझ तसेच महिलांच्या विभागात आर्यना साबालेंकाने शेवटच्या 16 खेळाडूत स्थान मिळविले आहे.

या स्पर्धेत पुरूष एकेरीच्या सामन्यात स्पेनच्या कार्लोस अल्कारेझने थियागो सेबोथ विल्डचा 6-3, 6-3, जर्मनीच्या अॅलेक्झांडर व्हेरेवने कॅनडाच्या डेनिस शेपोव्हॅलोव्हचा 6-4, 7-5, रशियाच्या रुबलेव्हने फोकिनाचा 7-6 (12-10), 6-4 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. अल्कारेझने यापूर्वी ही स्पर्धा दोन वेळेला जिंकली असून त्याचा पुढील फेरीतील सामना स्ट्रफशी होणार आहे.

Advertisement

महिलांच्या विभागात द्वितीय मानांकित साबालेंकाने 19 वर्षीय रॉबिन माँटेगोमेरीच 6-1, 6-7 (5-7), 6-4 असा पराभव करत शेवटच्या 16 खेळाडूत स्थान मिळविले. अडीच तास चाललेल्या या सामन्यात माँटेगोमेरीने साबालेंकाला विजयासाठी चांगलेच झुंजविले. अन्य एका सामन्यात चौथ्या मानांकित इलिना रिबाकिनाने मेयर शेरिफचा 6-1, 6-4, मिरा अँड्रीव्हाने व्होड्रोसोव्हाचा 7-5, 6-1 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.

Advertisement
Tags :

.