For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अॅल्कारेझ, मेदव्हेदेव विजयी, नदाल पराभूत

06:38 AM May 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
अॅल्कारेझ  मेदव्हेदेव विजयी  नदाल पराभूत
Advertisement

महिलांच्या विभागात स्वायटेक सलग दुसऱ्या वर्षी उपांत्य फेरीत

Advertisement

वृत्तसंस्था/ माद्रीद

एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या माद्रीद खुल्या पुरूष आणि महिलांच्या आंतराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनच्या कार्लोस अॅल्कारेझने एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठताना स्ट्रफचा पराभव केला. तर स्पेनच्या माजी टॉपसिडेड राफेल नदालला लिहेकाकडून पराभव पत्करावा लागला. नदालचा या स्पर्धेतील हा शेवटचा सहभाग आहे. महिलांच्या विभागात पोलंडच्या इगा स्वायटेकने सलग दुसऱ्या वर्षी या स्पर्धेत उपांत्यफेरी गाठताना बिट्रेझ हेदाद माईयाचा पराभव केला. स्वायटेक आणि अमेरिकेची मॅडिसन किज यांच्यात उपांत्य फेरीची लढत होईल. पुरूष विभागात मेदव्हेदेवने पुढील फेरीत प्रवेश केला आहे.

Advertisement

पुरूष एकेरीच्या सामन्यात स्पेनच्या अॅल्कारेझला स्पेनच्या स्ट्रफने विजयासाठी तब्बल 3 तास झुंझविले. अॅल्कारेझने स्ट्रफचा 6-3, 6-7 (5-7), 7-6 (7-4) असा पराभव केला. पुढील महिन्यात फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा होणार असून या स्पर्धेसाठी अॅल्कारेझने आतापासूनच आपल्या सरावावर अधिक भर दिला आहे. मध्यंतरी दुखापतीमुळे अॅल्कारेझला माँटे कार्लो व बार्सिलोना स्पर्धांना मुकावे लागले होते. अन्य एका सामन्यात 31 व्या मानांकीत लिहेकाने स्पेनच्या माजी टॉपसिडेड राफेल नादालचा 7-5, 6-4 अशा सरळ सेटसमध्ये पराभव केला. नदालची ही शेवटची स्पर्धा असल्याने टेनिस शौकीनांनी त्याला या सामन्यानंतर उभे राहून मानवंदना दिली. नदालने माद्रीद टेनिस स्पर्धा आतापर्यंत 5 वेळेला जिंकली आहे. तसेच 37 वर्षीय नदालने 22 गँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविण्याचा पराक्रम केला आहे. पुरूष एकेरीच्या अन्य एका सामन्यात इटलीच्या टॉपसिडेड जेनिक सिनेरने कॅचेनोव्हचा 5-7, 6-3, 6-3, रशियाच्या तृतीय मानांकीत मेदव्हेदेवने बुबलीकचा 7-6 (7-3), 6-4, रूबलेव्हने ग्रीकस्पूरचा 6-2, 6-4, सेरूनडोलोने व्हेरेव्हचा 6-3, 6-4, अमेरिकेच्या टेलर फ्रिझने हुरकेझचा 7-6 (7-2), 6-4 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

महिलांच्या विभागात पोलंडच्या स्वायटेकने बिट्रेझ हदाद माईयाचा 4-6, 6-0, 6-2 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. अमेरिकेच्या मॅडीसन किजने  आठव्या मानांकीत ट्यूनिशियाच्या जेबॉरचा 0-6, 7-5, 6-1 असा पराभव केला. स्वायटेक आणि किज यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होईल.

Advertisement
Tags :

.