महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अल्कारेझ, गॉफ चौथ्या फेरीत दाखल

06:03 AM Jul 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/लंडन

Advertisement

2024 च्या टेनिस हंगामातील येथे सुरू असलेल्या विम्बल्डन ग्रासकोर्ट ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेत स्पेनचा कार्लोस अल्कारेझ तसेच महिलांच्या विभागात अमेरिकेची कोको गॉफ व राडूकानु यांनी चौथ्या फेरीत प्रवेश केला. मात्र भारताच्या युकी भांब्री आणि ओलिव्हेटी यांचे दुहेरीतील आव्हान दुसऱ्या फेरीत समाप्त झाले.

Advertisement

पुरूष एकेरीच्या तिसऱ्या फेरीतील सामन्यातील स्पेनच्या कार्लोस अल्कारेझला अमेरिकेच्या टिफोईने विजयासाठी पाच सेटस्मध्ये झुंजविले. अल्कारेझला हा सामना जिंकताना खूपच कसरत करावी लागली. या स्पर्धेतील विद्यमान विजेत्या अल्कारेझने अमेरिकेच्या टिफोईचा 5-7, 6-2, 4-6, 7-6(7-2), 6-2 असा पराभव करत चौथी फेरी गाठली. अल्कारेझने आतापर्यंत 12 सामने पाच सेटस्मधील लढतीत जिंकले असून एक सामना गमविला आहे. टिफोईने पहिला सेट जिंकून अल्कारेझवर आघाडी मिळविल्यानंतर अल्कारेझने दुसरा सेट जिंकून बरोबरी साधली. दरम्यान या लढतीतील टिफोईने तिसरा सेट जिंकून पुन्हा अल्कारेझवर आघाडी घेतली. अल्कारेझने टायब्रेकरमधील चौथा सेट जिंकून टिफोईशी बरोबरी साधली. पण पाचव्या आणि शेवटच्या सेटमध्ये टिफोईला केवळ दोन गेम्स् जिंकता आल्याने अल्कारेझने ही लढत जिंकून चौथ्या फेरीत प्रवेश केला.

महिलांच्या तिसऱ्या फेरीतील सामन्यात अमेरिकेच्या व्दितीय मानांकित कोको गॉफने ब्रिटनच्या सोना कार्टलचा 6-4, 6-0 असा फडशा पाडत चौथ्या फेरीत स्थान मिळविले. त्याच प्रमाणे माजी अमेरिकेन ग्रॅन्डस्लॅम विजेत्या इमा राडूकानुने चौथ्या फेरीत प्रवेश मिळविताना इटलीच्या मारिया सॅकेरीचे आव्हान 6-2, 6-3 असे संपुष्टात आणले.

पुरूष दुहेरीमध्ये भारताच्या युकी भांब्री आणि त्याचा फ्रान्सचा साथीदार ओलीव्हेटी यांचे आव्हान दुसऱ्या फेरीत समाप्त झाले. दुसऱ्या फेरीतील सामन्यात जर्मनीच्या केव्हिन क्रेवेज आणि टीम प्युझ यांनी भांब्री आणि ओलिव्हेटी यांचा 4-6, 6-3, 6-3 अशा सेटमध्ये पराभव केला. आता या स्पर्धेत भारताच्या रोहन बोपण्णाचे आव्हान अद्याप जिवंत आहे. सुमिन नागल आणि एन. श्रीराम यांनाही या स्पर्धेच्या सुरूवातीलाच हार पत्करावी लागली होती.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article