For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अल्कारेझ, सिनेर, सित्सिपस उपांत्यपूर्व फेरीत

06:45 AM Jun 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
अल्कारेझ  सिनेर  सित्सिपस उपांत्यपूर्व फेरीत
Advertisement

साबालेंका, रायबाकेना महिला एकेरीच्या शेवटच्या आठ खेळाडूत

Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरिस

2024 च्या टेनिस हंगामातील येथे सुरु असलेल्या फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीमध्ये स्पेनचा कार्लोस अल्कारेझ, इटलीचा जेनिक सिनेर तसेच ग्रीकच्या सित्सिपस यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. महिलांच्या विभागात आर्यना साबालेंका, इलिना रायबाकेना तसेच पोलंडच्या टॉप सिडेड स्वायटेकने शेवटच्या 8 खेळाडूत स्थान मिळविले आहे.

Advertisement

पुरुष एकेरीच्या खेळविण्यात आलेल्या चौथ्या फेरीतील सामन्यात स्पेनच्या तृतीय मानांकित अल्कारेझने कॅनडाच्या 21 व्या मानांकित फेलिक्स ऑगेर अॅलिसिमेचा 6-3, 6-3, 6-1 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अन्य एका सामन्यात ग्रीकच्या सित्सिपसने इटलीच्या बिगर मानांकित मॅटो अॅमेल्डीवर 3-6, 7-6 (7-4), 6-2, 6-2 असा पराभव करत शेवटच्या 8 खेळाडूत स्थान मिळविले. या विजयामुळे सित्सिपसने फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकण्याचे आपले आव्हान जिवंत ठेवले आहे. इटलीच्या अॅमेल्डीने यापूर्वीच्या सामन्यात रशियाच्या सहाव्या मानांकित रुबलेव्हला पराभवाचा धक्का दिला होता.

महिला एकेरीच्या चौथ्या फेरीतील सामन्यात बेलारुसच्या द्वितीय मानांकित आर्यना साबालेंकाने अमेरिकेच्या ईमा नेव्हारोचा 6-2, 6-3 असा पराभव करत शेवटच्या 8 खेळाडूत स्थान मिळविले. साबालेंकाने या सामन्यातील पहिला सेट केवळ 30 मिनिटात जिंकला. ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत साबालेंकाने आतापर्यंत सलग 11 सामने जिंकले आहेत. महिलांच्या चौथ्या फेरीतील अन्य एका सामन्यात कझाकस्तानच्या चौथ्या मानांकित इलिना रायबाकेनाने युक्रेनच्या इलिना स्विटोलिनाचे आव्हान 6-4, 6-3 असे संपुष्टात आणत उपांत्यपूर्व फेरी गाठली. आता रिबाकेनाचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना इटलीच्या जस्मिन पाओलिनीशी होणार आहे. पोलंडच्या टॉप सिडेड इगा स्वायटेकने या स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. स्वायटेकचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना झेकच्या मर्केटा व्होंड्रोसोवाशी होईल. व्होंड्रोसोवाने चौथ्या फेरीतील सामन्यात बिगर मानांकित सर्बियाच्या डॅनिलोव्हीकचा 6-4, 6-2 असा फडशा पाडला. ट्युनेशियाच्या जेबॉरने बिगर मानांकित टॉसनचा 6-4, 6-4 असा पराभव करत शेवटच्या 8 खेळाडूत स्थान मिळविले. गॉफ आणि जेबॉर यांच्यात उपांत्यपूर्व फेरीची लढत होईल.

Advertisement
Tags :

.