For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अल्कारेझ, सिनेर उपांत्य फेरीत

06:45 AM Jun 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
अल्कारेझ  सिनेर उपांत्य फेरीत
Advertisement

टॉप सिडेड जोकोविचची दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार

Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरीस

2024 च्या टेनिस हंगामातील येथे सुरू असलेल्या फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीमध्ये स्पेनचा कार्लोस अल्कारेझ तसेच इटलीचा जेनिक सिनेर यांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. मात्र, या स्पर्धेतील विद्यमान विजेता आणि टॉप सिडेड सर्बियाचा जोकोविच याने दुखापतीमुळे माघार घेतली. ग्रीसचा स्टिफॅनोस सित्सिपस तसेच बल्गेरियाचा डिमिट्रोव यांचे आव्हान संपुष्टात आले.

Advertisement

पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात स्पेनच्या कार्लोस अल्कारेझने ग्रीसच्या सित्सिपसचा 6-3, 7-6(7-3), 6-4 अशा सेट्समध्ये पराभव करत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळविले. या संपूर्ण सामन्यात अल्कारेझने आपल्या वेगवान सर्व्हिसच्या जोरावर सित्सिपसला सरळ सेट्समध्ये पराभूत केले. एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत अल्कारेझ अव्वल स्थान मिळविण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. उपांत्य फेरी अल्कारेझची लढत इटलीच्या सिनेरशी होणार आहे.

पुरुष एकेरीच्या अन्य एका उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इटलीच्या जेनिक सिनेरने बल्गेरियाच्या ग्रीगोर डिमिट्रोवचा 6-2, 6-4, 7-6(7-3) असा पराभव उपांत्य फेरी गाठली. या स्पर्धेमध्ये सिनेरने पहिल्यांदाच उपांत्यफेरीपर्यंत मजल मारली आहे. हा सामना अडीच तास चालू होता. सर्बियाचा टॉप सिडेड जोकोविचने दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतली आहे. गेल्या सोमवारी चौथ्या फेरीतील सामन्यात खेळताना जोकोविचच्या उजव्या गुडघ्याला स्नायू दुखापत झाली होती. जोकोविचने या सामन्यात सेरुनडोलोचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला होता. बुधवारी त्याचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना नॉर्वेच्या सातव्या मानांकित कास्पर रुडशी खेळविला जाणार होता पण दुखापतीमुळे हा सामना सुरू होण्यापूर्वीच जाकोविचने स्पर्धेतून माघार घेतली आहे. या स्पर्धेतून माघार घेतल्याने एटीपीच्या मानांकनातील अव्वल स्थान त्याला गमवावे लागणार आहे. आता अल्कारेझ नव्या मानांकन यादीत अग्रस्थान मिळवेल.

Advertisement
Tags :

.