महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अक्षया देवधर पुन्हा चित्रपटसृष्टीत

06:20 AM Dec 09, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सायली संजीवबरोबर झळकली

Advertisement

मराठी चित्रपटसृष्टीत मागील काही काळापासून विविध धाटणीचे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्यातच आता एक नवा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ‘पिल्लू बॅचलर’ असे या नव्या चित्रपटाचे नाव असून यातून अभिनेत्री अक्षया देवधरने चित्रपटसृष्टीत पुनरागमन केले आहे.

Advertisement

पिल्लू बॅचलर या चित्रपटात विनोदी कथा पहायला मिळणार आहे. या चित्रपटात पार्थ भालेराव, सायली संजीव, अक्षया देवधर, शशांक शेंडे, डॉ. मोहन आगाशे असे दिग्गज कलाकार आहेत. हा चित्रपट 8 डिसेंबरला प्रदर्शित झाला आहे. वर्षा पाटील, सुनील फडतरे, अभिजीत देशपांडे यांनी या चित्रपटाची निर्मिती करविली आहे. अरविंद जगताप यांची पटकथा लाभलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन तानाजी घाडगे यांनी केले आहे. बस्ता, बरड असे उत्तम चित्रपट तानाजी घाडगे यांनी सादर केले आहेत. या चित्रपटासाठी गीतलेखन मंगेश कागणे यांनी केले आहे. तर चिनार महेश यांनी संगीत दिग्दर्शन तर सूर्या मिश्रा यांनी छायांकन केले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article