महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

विहिंप-बजरंग दलवतीने खानापुरात अक्षता कलश मिरवणूक

11:45 AM Jan 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तालुक्यातील कार्यकर्त्यांकडून भव्य स्वागत

Advertisement

खानापूर : अयोध्या येथे जानेवारी 22 रोजी होणाऱ्या प्रभू श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल खानापूर यांच्यावतीने  अयोध्येहून आलेल्या मंगल अक्षतांचे तालुक्यातील ग्रामीण तसेच शहर विभागात  वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी 30 रोजी येथील शुभम गार्डन येथे करण्यात आले. अध्यक्षस्थानी खानापूर तालुका विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष गोविंद किरमटे होते. वकील चेतन मणेरीकर यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर अयोध्येहून आलेल्या पवित्र अक्षता व कलशाचे पूजन व आरती करण्यात आली. यावेळी आरएसएसचे विभागीय कार्यवाह रामचंद्र एडगे, अक्षता अभियानचे विभाग प्रमुख दत्ता नाईक यांनी मंगल अक्षतांचे पूजन आणि वितरण कशा प्रकारे करावे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. तालुक्यातील विभाग प्रमुखांकडे पवित्र अक्षतांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मारुती महाराज, क-नंदगड, रामदास महाराज, तोपिनकट्टी, आर. पी. जोशी यांची भाषणे झाली. भाजपा जिल्हा अध्यक्ष माजी आमदार संजय पाटील, आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका अध्यक्ष संजय कुबल, तसेच  तालुक्यातील बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, विभाग प्रमुख, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatsindhudurg
Next Article