अक्षरयात्रा राशिभविष्य
दि. 20-07-2025 ते 26-07-2025 पर्यंत
मेष
या आठवड्यात ‘द सन’ कार्ड आले आहे. कार्यक्षेत्रात यश मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. प्रेमसंबंध गोड होतील. कौटुंबिक सौहार्द लाभेल. आरोग्य उत्तम राहील. जुने प्रश्न मार्गी लागतील. नवे प्रकल्प हाती घ्याल. मित्रांकडून मदत मिळेल. जान है तो जहान है, हे लक्षात ठेवून तब्येतीची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. काही बाबतीमध्ये आत्मविश्वास कमी पडेल त्याचबरोबर कुटुंबाची साथही तितकीशी मिळणार नाही.
मंगळवारी गुळ-रोटी दान करा.
वृषभ
‘द स्टार’ कार्ड आशावाद घेऊन येत आहे. नवीन संधी मिळतील. आर्थिक लाभ संभवतो. प्रेमात गोडवा. जुने वाद मिटतील. कुटुंबात सौख्य. आरोग्य सुधारेल. मित्रांशी सुसंवाद. थोडा प्रवास संभवतो. तब्येतीची हेळसांड करू नका. दुखणे विकोपाला जाण्याची शक्मयता आहे. आर्थिक आवक ठीकठाक राहील. कामाकरता प्रवास करावा लागू शकतो.
शुक्रवारी पांढऱ्या फुलांनी पूजा करा.
मिथुन
‘द मून’ कार्ड भावनात्मक ताण दाखवतेय. गैरसमज टाळा. प्रेमसंबंधात संयम. खर्चावर नियंत्रण. आरोग्य जपा. कामात धीर आवश्यक. घरातील वातावरण थोडे संवेदनशील. प्रवासात अडचण. ताणतणाव कमी करा. ध्यानधारणा उपयुक्त. घरातील एखाद्या व्यक्तीच्या वागण्याचा त्रास होऊ शकतो. आपल्या मनातील गोष्ट दुसऱ्यांना सांगण्याच्या भानगडीत पडू नका. तब्येत ठीकठाक राहील. पैसे मिळवण्याकरता जास्त कष्ट करण्याची गरज आहे.
बुधवारी गणपतीला दूर्वा अर्पण करा.
कर्क
‘द व्हील ऑफ फॉर्च्यून’ कार्ड सुदैव दर्शवते. अचानक लाभ. कामात यश. जुने अडथळे दूर. प्रेमात सुसंवाद. घरात शुभप्रसंग. आरोग्य उत्तम. नवा प्रकल्प हाती घ्याल. आत्मविश्वास वाढेल. दैनंदिन कामात गती. नोकरदार वर्गाने वरिष्ठांची मर्जी राखलेली बरी. वैवाहिक जीवनात ताण-तणावाचे प्रसंग येऊ शकतात. वाहन चालवताना अत्यंत सावध राहणे गरजेचे आहे.
सोमवारी शिवपिंडीवर जल अर्पण करा.
सिंह
‘द एम्परर’ कार्ड नेतृत्व दर्शवते. कामात वरिष्ठांचा पाठिंबा. निर्णय ठाम घ्या. आर्थिक गुंतवणुकीत यश. प्रेमसंबंध गोड. घरात शांतता. आरोग्य चांगले. सामाजिक मान. मित्रांकडून मदत. सल्ला ऐकून पुढे चला. आर्थिक बाबतीमध्ये अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. एखादी व्यक्ती जी तुमचे पैसे लुबाडण्याच्या मार्गावर आहे तिच्यापासून दूर रहावे. प्रवास टाळावा. कारण धनहानी होऊ शकते.
रविवारी सूर्याला जल अर्पण करा.
कन्या
‘द हाय प्रिस्टेस’ कार्ड गूढ गोष्टी सूचित करते. मन शांत ठेवा. महत्त्वाच्या निर्णयांपासून थोडे लांब रहा. आरोग्यावर लक्ष ठेवा. संबंधात समजून घ्या. आर्थिक व्यवहार जपून करा. आध्यात्मिक वाचन उपयोगी. आत्मपरीक्षण करा. मन:शांतीसाठी ध्यानधारणा उपयुक्त. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे टोमणे खावे लागतील. वैवाहिक जीवनात ताणतणाव असेल.
बुधवारी हरिद्रा कुंकू अर्पण करा.
तुला
‘द लव्हर्स’ कार्ड नातेसंबंधांचा हळूवार काळ दाखवते. प्रेमसंबंधात गोडवा. नवे संबंध निर्माण. घरात आनंदाचे वातावरण. आर्थिक लाभ संभवतो. मित्रांकडून सहकार्य. प्रवास संभवतो. करिअरमध्ये चांगला बदल. आरोग्य सुधारेल. सकारात्मकता वाढेल. नोकरदार वर्गाने या काळामध्ये विशेष काळजी घेतलेली बरी. तुमच्या कष्टांना किंवा तुमच्या कामे पूर्ण करण्याच्या पद्धतीला वरिष्ठांकडून दाद मिळेलच, असे सांगता येत नाही. तब्येतीला जपावे लागेल.
शुक्रवारी गुलाब फुले वाहा.
वृश्चिक
‘डेथ’ कार्ड जुने टोकाचे निर्णय दर्शवते. काही जुने संबंध संपुष्टात. नवीन सुऊवात. आरोग्यावर लक्ष द्या. कामात धैर्य ठेवा. गैरसमज दूर करा. नवा करार फायदेशीर. आर्थिक वाद मिटतील. मन:शांती राखा. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला. जवळच्या व्यक्तीला भेटण्याकरता गावाला जावे लागू शकते. काही ठिकाणी पैसे अडकण्याची शक्मयता आहे. वसुली करता विशेष प्रयत्न करावे लागतील. कुटुंबामध्ये थोडाबहुत कलह संभवतो.
मंगळवारी हनुमान चालिसा पठण करा.
धनु
‘द चॅरियट’ कार्ड संघर्षावर विजय दाखवते. अडथळे पार कराल. यश जवळ. मानसिक ताण कमी होईल. आरोग्य सुधारेल. आर्थिक स्थिती मजबूत. प्रेमात समजूतदारपणा. नवा प्रकल्प यशस्वी. सामाजिक मान वाढेल. प्रवास संभवतो. पैशांची आवक उत्तम असेल. घरात छोटेखानी समारंभ होऊ शकतो. प्रवास टाळावा. वाहन सुख उत्तम आहे. छोट्या गुंतवणुकीतून फायदा होईल.
गुरुवारी हळदीचा तिलक लावा.
मकर
‘द हायरोफंट’ कार्ड परंपरागत मूल्यांचे महत्त्व सांगते. कुटुंबाशी सुसंवाद. जुने प्र श्न मार्गी लागतील. मानसिक समाधान. कामात चांगली संधी. आर्थिक लाभ संभवतो. सामाजिक मान वाढेल. धार्मिक कामात सहभाग. अध्यात्मात रस. नोकर वर्गाला कष्टाचे प्रमाण वाढवावे लागेल. वैवाहिक जीवन मधूर असेल. वाहन जपून चालवा दुखापतीची शक्मयता आहे.
शनिवारी काळ्या वस्त्राचे दान करा.
कुंभ
‘द वर्ल्ड’ कार्ड परिपूर्णता दाखवते. जुनी स्वप्ने पूर्ण. आर्थिक उन्नती. करिअरमध्ये बदल. नवे प्रोजेक्ट हाती. प्रेमसंबंध गोड. प्रवास संभवतो. कौटुंबिक सौख्य. आरोग्य चांगले. आत्मविश्वास वाढेल. प्रवास शक्मयतो टाळावा. ज्येष्ठ व्यक्तींशी मतभेद होऊ शकतात. प्रेम प्रसंगात ताणतणाव येईल. धोकादायक गुंतवणूक करू नका. नोकरवर्गाला उत्तम काळ आहे.
शनिवारी काळ्या तिळाचे दान करा.
मीन
‘द जजमेंट’ कार्ड निर्णयाचा काल दाखवते. काही जुनी प्रकरणे मार्गी लागतील. न्याय मिळेल. प्रेमात स्पष्टपणा. आर्थिक परिस्थिती सुधारेल. नवा करार यशस्वी. आरोग्यावर लक्ष ठेवा. आध्यात्मिक उन्नती. आत्मपरीक्षण करा. गुप्तशत्रूंचा त्रास कमी होईल. चहाडी करणाऱ्यांची तोंडे बंद होतील. व्यवसायामध्ये नाव कमवाल. मित्रांकडून मदत मिळेल.
उपाय : गुरुवारी पिवळ्या रंगाचे वस्त्र दान करा.
रात्रीची शांत झोप हे महासुख आहे, त्याकरता गाढ झोपेसाठी टोटके (1) झोपण्यापूर्वी तुळशीच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावा आणि “ॐ शांती शांती शांती:” मंत्र 11 वेळा म्हणा. (2) डोक्याजवळ कापूर व लवंग ठेवा. (3) झोपताना उशाजवळ एका वाटीत कपूर व दोन लवंग ठेवा. (4) सात ठिकाणी पाणी शिंपडणे. झोपण्याआधी खोलीच्या चार कोपऱ्यात, पलंगाखाली, दरवाजाजवळ आणि उशाजवळ पाणी शिंपडा.