अक्षरयात्रा राशिभविष्य
दि. 24-8-2025 ते 30-8-2025 पर्यंत
मेष
`The Chariot` कार्ड तुमच्या आत्मविश्वासाची आणि पुढे जाण्याच्या शक्तीची निशाणी आहे. कामाच्या ठिकाणी निर्णायक भूमिका घ्याल. वैयक्तिक जीवनातही निर्णय घेण्याची वेळ येईल. पैशांची आवक संतोषजनक राहील. जोखीम टाळा. प्रवासाचे योग येतील. आरोग्य सुधारेल. जुने मित्र भेटतील. जोडीदाराशी संवाद वाढवा.
मंगळवारी लाल फुले देवीला अर्पण करा.
वृषभ
`The Empress` कार्ड जीवनातील सौंदर्य, संपन्नता आणि पोषण दर्शवते. कौटुंबिक वातावरण सकारात्मक राहील. आर्थिक बाबतीत लाभदायक आठवडा आहे. स्त्राr सदस्यांकडून मदत मिळेल. घरासाठी काही नवीन वस्तू विकत घ्याल. नोकरीत स्थैर्य लाभेल. आरोग्य सुधारेल. प्रेमसंबंध दृढ होतील. स्त्राr वर्गासाठी हा काळ विशेष शुभ आहे. मानसिक स्थैर्य राहील.
गायीला गोड अन्न द्या.
मिथुन
`The Lovers` कार्ड आपल्या जीवनातील महत्त्वाच्या संबंधांकडे लक्ष वेधते. निर्णय घेताना मन:शांती ठेवा. प्रेमसंबंधात नवे वळण येईल. नोकरीत भागीदारीचे संकेत आहेत. संवाद स्पष्ट असावा. आर्थिकदृष्ट्या स्थिरता लाभेल. भावनिकदृष्ट्या चढ-उतार जाणवतील. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्या. घरात एखादे महत्त्वाचे वादग्रस्त प्रकरण मार्गी लागेल. मित्रांसोबत वेळ घालवाल.
बुधवारच्या दिवशी तुळशीला पाणी घाला.
कर्क
`The Moon` कार्ड तुमच्या अंतर्मनातील भ्रम आणि भीती दर्शवते. निर्णय घेताना मन स्थिर ठेवा. जुने विषय डोके वर काढू शकतात. कुटुंबात सुसंवाद ठेवा. आरोग्याच्या बाबतीत मानसिक थकवा जाणवू शकतो. आर्थिक निर्णय विलंबित करा. प्रेमसंबंधात गैरसमज होऊ शकतो. नोकरीत गुप्त प्रतिस्पर्धा असू शकते. विद्यार्थ्यांनी लक्ष्यावर लक्ष केंद्रित करावे. सर्जनशील कार्यासाठी उत्तम काळ. स्वप्नांमध्ये संदेश मिळू शकतो.
सोमवारी पांढऱ्या वस्त्रात दूध आणि साखर दान करा.
सिंह
‘`The Sun` हा अत्यंत शुभ संकेत आहे. यश, समाधान आणि प्रसिद्धी यांचा काळ आहे. नोकरीत उत्तम प्रगती. आर्थिक लाभ. कौटुंबिक जीवनात आनंद. प्रवास शुभ. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. विद्यार्थी यशस्वी होतील. आरोग्य उत्तम राहील. मुलांबाबत आनंद मिळेल. समाजात प्रतिष्ठा वाढेल. नेतृत्वगुण चमकतील. आत्मविश्वास वाढेल.
सूर्यदेवाला जल अर्पण करा.
कन्या
`The Hermit` कार्ड तुम्हाला अंतर्मुख होऊन विचार करण्याचा सल्ला देते. एकांतातून दिशा सापडेल. कामात तात्पुरती स्थिरता. जुने प्रोजेक्ट पूर्ण करा. नवे निर्णय पुढे ढकला. प्रेमात अंतर राहू शकते. आध्यात्मिक वाचन करा. आर्थिक योजनांची पुनर्तपासणी आवश्यक. आरोग्याच्या बाबतीत ध्यान उपयुक्त ठरेल. शिक्षक किंवा गुरुचा सल्ला घ्या. आत्मविश्वास वाढेल.
बुधवारी हरित धान्य दान करा.
तुळ
`Justice` कार्ड समतोल आणि निर्णय यांचे प्रतीक आहे. कायदेशीर बाबींमध्ये यश. नोकरीत पदोन्नतीचे योग. निर्णय घेताना तटस्थता ठेवा. संबंधांमध्ये समजून घेणे महत्त्वाचे. आर्थिक व्यवहार पारदर्शक ठेवा. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. प्रेमसंबंधात समतोल आवश्यक. आरोग्य सुधारेल. जुने प्रश्न मार्गी लागतील. अधिकारप्राप्त व्यक्तींकडून मदत मिळेल.
गरिबांना साखर दान करा.
वृश्चिक
`Death` कार्ड बदलाचे सूचक आहे. जुने सोडून नवीन स्वीकारा. नोकरीत बदल संभवतो. आर्थिक स्थिती सुधारेल. प्रेमात नवीन सुरुवात. जुन्या सवयींपासून मुक्त व्हाल. आरोग्यात सुधारणा. मानसिकदृष्ट्या नवा टप्पा. कुटुंबात काही गोष्टी संपुष्टात येतील. सर्जनशीलतेला चालना मिळेल. प्रवास संभवतो. आध्यात्मिक प्रगती होईल.
मंगळवारी लाल वस्त्र दान करा.
धनु
`Wheel of Fortune` कार्ड नशिबाच्या बदलाची निशाणी आहे. अनपेक्षित लाभ संभवतो. नोकरीत संधी मिळेल. आर्थिक स्थिती बळकट. प्रवास लाभदायक. प्रेमसंबंधात सकारात्मक वळण. कुटुंबात शुभकार्य. जुने प्रकल्प यशस्वी होतील. विद्यार्थ्यांना नवे मार्ग मिळतील. आरोग्य सुधारेल. नवे संपर्क वाढतील. व्यवसायात नफा असेल.
गुरुवारी पिवळ्या वस्त्रात हरबऱ्याची डाळ दान करा.
मकर
`The Devil` कार्ड आंतरमनातील बंधनांचे प्रतीक. व्यसन, भीतीपासून दूर रहा. नोकरीत तणाव असेल. आर्थिक बाबतीत लोभ टाळा. नातेसंबंधांमध्ये नियंत्रणाची भावना. भावनिक तणाव संभवतो. आध्यात्मिक शुद्धी आवश्यक. ध्यान, योग उपयुक्त. आत्मनिरीक्षण करा. चुकीच्या गोष्टींपासून दूर रहा. व्यसनमुक्तीचा काळ. सकारात्मक संगती ठेवा.
शनिवारी काळे उडद आणि मोहरीचे तेल दान करा.
कुंभ
`The Star` कार्ड आशेचे, नव्या शक्यतांचे प्रतीक आहे. नोकरीत प्रेरणा मिळेल. नव्या नोकरीच्या शोधात असलेल्यांना आशादायक काळ आहे. आर्थिक योजनांना गती. प्रेमसंबंध उजळतील. मानसिक शांतता. नवे प्रकल्प यशस्वी होतील. आरोग्य सुधारेल. आध्यात्मिक कल गवसेल. नवे मित्र मिळतील. आत्मविश्वास वाढेल.
शनिवारी एखाद्या वृद्ध व्यक्तीस चपला किंवा वस्त्र दान करा.
मीन
`The High Priestess` कार्ड अंतर्ज्ञान आणि गूढतेचे प्रतीक. तुमच्या कडून लपवल्या गेलेल्या गोष्टी समोर येतील. निर्णय घेण्याआधी विचार करा. नात्यात संयम ठेवा. आर्थिक बाबतीत गोपनीयता ठेवा. नोकरीत शांत पण प्रभावी कामगिरी योग्य ठरेल. आरोग्य स्थिर असेल. ध्यान, स्वप्नांचे निरीक्षण उपयुक्त. स्त्रियांसाठी हा काळ विशेष गूढतेचा.
सोमवारी दुग्धाभिषेक करा.
घरातील कोणालाच मानसिक शांती नसते. सगळे रागराग करतात. रोख रक्कम टिकत नाही. काहीही बदल करायचा झाल्यास किंवा नवीन काही योजना बनवण्याचा विचार केल्यास अनेक अडचणी येतात. घरातील नळ बिघडतात, पाणी वाया जाते. अशा वेळेस जल देवतेची पूजा उपयुक्त ठरते. नदीतून 5 दगड आणून जलदेवता समजून पूजन करावे. तांदळाच्या खिरीचा आणि दहिभाताचा नैवेद्य दाखवावा. सायंकाळी विसर्जन करावे. असे 7 सोमवार करावे.