अक्षरयात्रा राशिभविष्य
मेष
या आठवड्यात The Magician कार्ड आले आहे. तुमची कौशल्ये व आत्मविश्वास तुमचे यश ठरवतील. नोकरीत नवीन संधी मिळतील. व्यवसायात कल्पकतेने काम केल्यास नफा होईल. आर्थिक स्थैर्य येईल. घरातील वादविवाद वाढतील. विवाहितांच्या नात्यात गोडवा वाढेल. आरोग्याच्या दृष्टीने सकारात्मक ऊर्जा राहील. मित्रांचा आधार लाभेल.
मंगळवारी घराबाहेर नारळ फोडा.
वृषभ
The Empress कार्ड तुमच्या जीवनात समृद्धी आणि आनंद सूचित करते. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. घरात सौख्य राहील. स्त्राr वर्गासाठी हा काळ अतिशय शुभ आहे. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. विवाहितांना जोडीदाराकडून साथ मिळेल. आरोग्य सुधारेल. प्रवास आनंददायी होईल. घरात नवे खरेदीयोग आहेत. कुटुंबात शुभकार्य होईल. आध्यात्मिक साधना वाढेल.
शुक्रवारी लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण करा.
मिथुन
The Lovers कार्ड नातेसंबंध व निर्णय महत्त्वाचे दर्शवते. प्रेमसंबंधात आनंदाचे क्षण येतील. विवाहितांनी जोडीदाराशी संवाद वाढवावा. नोकरीत नवी भागीदारी होईल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. आरोग्य यथातथा राहील. विद्यार्थ्यांना मैत्रीपूर्ण वातावरणात शिकायला मिळेल. प्रवासातून नवीन अनुभव येतील. मित्रांचा आधार फसवा असेल.
विष्णू मंदिरात तुळशीचे पान अर्पण करा.
कर्क
The Moon कार्ड भ्रम, भीती आणि गोंधळ दर्शवते. निर्णय घेताना काळजी घ्या. प्रेमसंबंधात गैरसमज होऊ शकतात. विवाहितांनी संयम राखावा. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. आरोग्यात मानसिक थकवा जाणवेल. विद्यार्थ्यांनी लक्ष विचलित होऊ देऊ नये. प्रवास अडथळ्यांचा ठरेल. घरात तणाव टाळा. मित्रांसोबत स्पष्ट संवाद ठेवा. स्वप्नांमधून संदेश मिळतील.
शिवलिंगावर पांढरे फूल अर्पण करा.
सिंह
The Sun कार्ड अत्यंत शुभ आहे. नोकरीत प्रगती आणि यश मिळेल. आर्थिक लाभ होईल. घरात आनंदाचे वातावरण राहील. विवाहितांना नवे सुख व आरोग्य उत्तम राहील. विद्यार्थ्यांना यश निश्चित मिळेल. प्रवास शुभ ठरेल. मित्रांचा आधार तसेच समाजात सन्मान वाढेल. घरात नवीन गोष्ट सुरू होईल. आत्मविश्वास वाढेल. जुने प्रश्न मिटतील. आध्यात्मिक कार्यात सहभाग वाढेल. तुमच्या नेतृत्वगुणांचा फायदा होईल.
सूर्यदेवाला जल अर्पण करा.
कन्या
The Hermit कार्ड आत्मपरीक्षणाची गरज दर्शवते. एकांतातून दिशा मिळेल. नोकरीत स्थिरता राहील. व्यवसायात जुने प्रकल्प पूर्ण करा. आर्थिक योजनांची तपासणी आवश्यक करा. प्रेमसंबंधात अंतर येऊ शकते. विवाहितांनी संयम ठेवावा. आरोग्य सांभाळा. विद्यार्थ्यांनी एकाग्रता वाढवावी. मित्रांपेक्षा आत्मचिंतन अधिक उपयुक्त असेल. घरात शांतता लाभेल. कुटुंबात वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्या.
मूग दान करा.
तूळ
Justice कार्ड जीवनात समतोल व योग्य निर्णय सूचित करते. नोकरीत बढतीचे योग आहेत. आर्थिक व्यवहार पारदर्शक ठेवा. प्रेमसंबंधात प्रामाणिक रहा. विवाहितांना नात्यात समजून घेणे गरजेचे. आरोग्य सुधारेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. घरात शांतता लाभेल. प्रवास शुभ ठरेल. मित्रांचा आधार लाभेल. कायदेशीर बाबतीत यश मिळेल. समाजात प्रतिष्ठा वाढेल. मानसिक स्थैर्य मिळेल.
शुक्रवारी गरिबांना गोडधोड अन्न द्या.
वृश्चिक
Death कार्ड बदलाचा संकेत देते. जुने सोडून नवीन स्विकारा. नोकरीत बदल संभवतो. व्यवसायात नवी सुऊवात कराल. आर्थिक स्थिती सुधारेल. प्रेमसंबंधात नवा टप्पा सुरू होईल. विवाहितांना नात्यात नवा अनुभव येईल. आरोग्य सुधारेल. मानसिक स्थैर्य वाढेल. प्रवास लाभदायी होईल. घरात काही जुने वाद मिटतील. मित्रांचा आधार मिळेल. सर्जनशीलता वाढेल. आध्यात्मिक प्रगती होईल.
मंगळवारी लाल वस्त्र दान करा.
धनु
Wheel of Fortune कार्ड नशिबात सकारात्मक बदल सूचित करते. नोकरीत संधी मिळेल. व्यवसायात नफा होईल. आर्थिक स्थितीत सुधारणा तसेच घरात शुभकार्य घडेल. प्रेमसंबंधात आनंद आणि विवाहितांना सुख मिळेल. आरोग्य उत्तम राहील. विद्यार्थ्यांना नवी दिशा लाभेल. प्रवास लाभदायी होईल. मित्रांचा आधार. परदेशातून लाभ. समाजात सन्मान. नवे प्रकल्प यशस्वी. आध्यात्मिकता वाढेल. मानसिक समाधान मिळेल.
पिवळी फुले विष्णूला अर्पण करा.
मकर
The Devil कार्ड सावधानतेचा इशारा देते. नोकरीत तणाव वाढेल. व्यवसायात लोभ टाळा. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. प्रेमसंबंधात तणाव राहील. विवाहितांना अहंकार टाळावा लागेल. आरोग्यात थकवा व व्यसनापासून सावध रहा. विद्यार्थ्यांनी एकाग्रता राखावी. प्रवासात अडथळे येतील. घरात संयम आवश्यक आहे. मित्रांसोबत भांडण टाळा.
शनिवारी काळे उडीद आणि तेल दान करा.
कुंभ
The Star कार्ड आशा आणि नव्या संधी सूचित करते. नोकरीत प्रगतीचे योग आहेत. व्यवसायात नवीन कल्पना यशस्वी होईल. आर्थिक स्थितीत सुधारणा होतील. प्रेमसंबंध उजळतील. विवाहितांना आनंद मिळेल. आरोग्य सुधारेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. प्रवास फायदेशीर. मित्रांचा आधार लाभेल. घरात शांतता. समाजात प्रतिष्ठा वाढेल. नवे प्रकल्प सुरू होतील. मानसिक शांती मिळेल. आध्यात्मिक साधना उपयुक्त.
वृद्धांना चप्पल दान करा.
मीन
The High Priestess कार्ड गुप्त ज्ञान आणि अंतर्ज्ञान दर्शवते. नोकरीत शांत पण प्रभावी कामगिरी. व्यवसायात गुप्त संधी मिळतील. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. प्रेमसंबंधात संयम. विवाहितांना नात्यात शांती मिळेल. आरोग्य स्थिर राहील. विद्यार्थ्यांनी ध्यान व अभ्यासावर भर द्यावा. प्रवास उपयुक्त ठरेल. मित्रांचा आधार लाभेल. घरात गूढ गोष्टी उघड होतील. समाजात सन्मान.
सोमवारी दुग्धाभिषेक करा.
व्यापार बंधनाकरता : काही लोक दुसऱ्याचा व्यापार चालू नये म्हणून व्यापार बंधन करवतात. याने त्यांचे पुढे नुकसान होतेच पण ज्याच्यावर हा प्रयोग केला गेलेला आहे त्याचे दुकान/ व्यापार चालायचे बंद होते. ग्राहक येत नाहीत किंवा नुसते येऊन जातात, व्यापार होत नाही. अशा वेळी एक बेदाग लिंबू घ्यावा. त्याला गंगाजलाने धुवावे. दुकानाच्या प्रत्येक भिंतीला स्पर्श करवून तो लिंबू 4 भागात कापावा आणि चारही दिशांना फेकून ‘ज्याने केले त्याला परत’ असे म्हणावे. सगळी नकारात्मकता निघून जाते.