कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अक्षरयात्रा राशिभविष्य

06:10 AM Sep 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष

Advertisement

The Emperor तुमच्या जीवनात स्थैर्य आणि शिस्त आणण्याचा सल्ला देत आहे. कामात अधिकारशाही वृत्ती ठेवणे फायदेशीर ठरेल, परंतु सहकाऱ्यांशी वाद टाळणे गरजेचे आहे. आर्थिक क्षेत्रात नवी गुंतवणूक करण्याची योग्य वेळ आहे. घरात वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन मिळेल. नोकरीत बढतीची शक्मयता निर्माण होईल. प्रेमसंबंधात प्रामाणिक संवाद आवश्यक आहे. आरोग्यात रक्तदाब, डोकेदुखी त्रास देऊ शकतो.

Advertisement

सकाळी सूर्याला जल अर्पण करा

वृषभ

या आठवड्यात The Hierophant  कार्ड मार्गदर्शक ठरेल. शिक्षण, आध्यात्मिकता आणि परंपरागत विचारांना महत्त्व द्यावे लागेल. आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल. मित्र-नातेवाईकांशी संबंध गोड राहतील. घरात धार्मिक कार्य होण्याची शक्मयता आहे. आरोग्याच्या दृष्टीने पचनसंस्थेकडे लक्ष द्या. प्रेमसंबंधात स्थैर्य लाभेल, परंतु हट्टीपणा टाळा.

शनिवारी गरीबांना काळे तीळ व अन्न दान करा.

मिथुन

The Lovers  या आठवड्यात महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायला लावेल. काम आणि वैयक्तिक जीवन यामध्ये समतोल साधणे गरजेचे आहे. नोकरीत नवीन संधी येतील. व्यवसाय भागीदारीत फायदा होईल. पायाला मार लागू शकतो. खर्च वाढू शकतो. प्रेमसंबंध दृढ होतील. विवाहितांना परस्परांचा आधार लाभेल. मित्रांचा सल्ला महत्त्वाचा राहील. प्रवासात आनंद मिळेल.

बुधवारी मुलांना मिठाई वाटा

कर्क

The Moon    कार्ड सावध राहण्याचा सल्ला देते. चुकीची माहिती किंवा भ्रमामुळे त्रास होऊ शकतो. नोकरीत गैरसमज होण्याची शक्मयता आहे. व्यवसायात काळजीपूर्वक निर्णय घ्या. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवा. घरात स्त्रियांचा मान ठेवा. आरोग्यात निद्रानाश व मानसिक तणाव जाणवेल. प्रेमसंबंधात गोंधळ होऊ शकतो. प्रवास टाळलेला बरा. मित्रांवर अति विश्वास ठेवू नका.

सोमवारी भगवान शंकराला पांढऱ्या फुलांची माळ अर्पण करा.

सिंह

या आठवड्यात The Sun कार्ड तुमच्यासाठी उज्ज्वल काळाची सुऊवात दाखवते. करिअरमध्ये नवे यश मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. आर्थिक लाभ होतील. घरात आनंदाचे वातावरण राहील. मुलांच्या प्रगतीची बातमी मिळेल. आरोग्य उत्तम राहील. प्रवास शुभ ठरेल. प्रेमसंबंधात नवा उत्साह येईल. विवाहितांना जोडीदाराचा आधार मिळेल. शत्रू पराभूत होतील.

रविवारी गूळ दान करा

कन्या

या आठवड्यात The Hermit कार्ड अंतर्मुख होण्याचा सल्ला देत आहे. कामात शांत राहून विचारपूर्वक निर्णय घ्या. नोकरीत एकट्याने केलेले काम अधिक यशस्वी होईल. व्यवसायात नवे करार करण्याआधी बारकाईने तपासणी करा. आर्थिक स्थितीत हळूहळू सुधारणा होईल. घरातील जबाबदाऱ्या वाढतील. आरोग्यात थोडा थकवा जाणवेल. प्रेमसंबंधात अंतर येऊ शकते.

गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करा

तुळ

Justice  कार्ड या आठवड्यात संतुलन व न्याय दाखवते. नोकरीत योग्य परिश्र्रमाला फळ मिळेल. व्यवसायात कायदेशीर कामे सुटण्याची शक्मयता आहे. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. घरात नातेवाईकांशी वाद उद्भवू शकतात, संयम बाळगा. आरोग्यात कंबर व पाठदुखी त्रासदायक ठरेल. प्रेमसंबंधात प्रामाणिक राहा, अन्यथा गैरसमज होऊ शकतात.

शनिवारी शनी मंदिरात तेल व काळे उडीद दान करा.

वृश्चिक

या आठवड्यात Death कार्ड परिवर्तनाचे संकेत देत आहे. नोकरीत बदलाची शक्मयता आहे. व्यवसायात जुने नुकसान थांबून नवी सुऊवात होईल. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी धाडसी निर्णय घ्यावा लागेल. घरातील वातावरण बदलत्या स्वरूपाचे असेल. आरोग्यात पोटदुखी व थकवा जाणवेल. प्रेमसंबंधात नवी व्यक्ती जीवनात येऊ शकते. मित्रांशी मतभेद संभवतात.

मंगळवारी हनुमानाला सिंदूर अर्पण करा.

धनु

या आठवड्यात Temperance कार्ड संयम व संतुलन शिकवते. नोकरीत काम-जीवन संतुलन राखल्यास यश मिळेल. व्यवसायात भागीदारी फायदेशीर ठरेल. आर्थिक स्थितीत हळूहळू स्थिरता येईल. घरात शांततेचे वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील. प्रेमसंबंधात समाधान व आनंद राहील. विवाहितांना सौहार्दपूर्ण वातावरण मिळेल. प्रवास आनंददायी ठरेल.

गुरुवारी पिवळी डाळ दान करा.

मकर

The Devil कार्ड या आठवड्यात सावधगिरीचा इशारा देत आहे. चुकीच्या सवयींमुळे त्रास होऊ शकतो. नोकरीत कटकारस्थान संभवते, म्हणून जागरूक रहा. व्यवसायात लोभ टाळा. आर्थिक क्षेत्रात अनावश्यक खर्च टाळा. घरात तणाव वाढू शकतो. आरोग्यात त्वचेचे विकार व पचनासंबंधी समस्या जाणवतील. प्रेमसंबंधात नकारात्मकता टाळा.

शनिवारी घोड्याच्या नालाची अंगठी धारण करा.

कुंभ

या आठवड्यात The Star कार्ड तुमच्यासाठी आशेचे किरण घेऊन आले आहे. नोकरीत यश निश्चित आहे. व्यवसायात नवे करार होतील. आर्थिक क्षेत्रात नफा मिळेल. घरात शुभकार्य होईल. आरोग्य सुधारेल. प्रेमसंबंधात विश्वास वाढेल. विवाहितांना जोडीदाराचा आधार मिळेल. प्रवास फलदायी ठरेल. विद्यार्थ्यांना उज्ज्वल यश मिळेल. मित्रांसोबत वेळ छान जाईल.

गरीबांना निळ्या रंगाचे कपडे दान करा.

मीन

या आठवड्यात The World  कार्ड पूर्णंचा संकेत देत आहे. नोकरीत मोठे यश मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. आर्थिक क्षेत्रात लाभ मिळेल. घरात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील. प्रेमसंबंधात नवे वळण येईल. विवाहितांना परस्पर आनंद लाभेल. प्रवास यशस्वी ठरेल. विद्यार्थ्यांना मोठ्या संधी मिळतील. मित्रांचा आधार राहील.

विष्णूला पिवळे फुल अर्पण करा.

शत्रुत्व जाण्या करता: आपल्या पायाच्या बोटापासून डोक्मयापर्यत मोजलेला सूती धागा घ्यावा. याला ‘कलावा’ असेही म्हणतात. हा दोरा आपल्या डोक्मयावरून घड्याळाच्या उलट्या दिशेने 7 वेळा उतरवून, त्रास देणाऱ्या व्यक्तीचे नाव घेऊन दक्षिणमुखी हनुमानाच्या मंदिरात मोहरीच्या तेलाच्या दिव्यात पेटवावा. हळूहळू शत्रू शत्रुत्व विसरून तुमचा दास होईल.

 

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article