अक्षरयात्रा राशिभविष्य
दि.17-8-2025 ते 23-8-2025 पर्यंत
मेष
या आठवड्यात 'The Fool' कार्ड नवीन सुरुवातीचे संकेत देते. एखाद्या नव्या प्रकल्पाची सुरुवात होईल. जोखीम असली तरी उत्साहाने निर्णय घ्याल. प्रेमसंबंध नव्याने फुलतील. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळतील. प्रवासाचे योग संभवतात. कुटुंबासोबत आनंददायक क्षण घालवाल. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. आरोग्य सामान्य राहील. योग्य निर्णयासाठी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या.
रविवारी लोकर वापरा.
वृषभ
'Temperance' कार्ड संतुलनाचे महत्त्व दर्शवते. कुटुंब आणि कामामध्ये समतोल राखाल पण यामध्ये मानसिक त्रास होईल. आर्थिक स्थिती सुधारेल. नोकरीत थोडी शांतता मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये संयम ठेवा. आरोग्य सुधारेल. मित्रांशी गोड संबंध राहतील. नवा प्रकल्प सुरू करण्यास अनुकूल काळ आहे. अडचणी पार कराल. घरातील वातावरण सकारात्मक राहील.
गुरुवारी पिवळा रंग परिधान करा.
मिथुन
'Justice' कार्ड यावेळी निर्णय आणि जबाबदारीचे संकेत देते. कायदेशीर बाबींमध्ये यश मिळू शकते. नोकरीत प्रामाणिकपणा फळ देईल. आर्थिक व्यवहारात पारदर्शकतेची गरज भासेल. कौटुंबिक जीवन स्थिर राहील. प्रेमसंबंधात प्रामाणिक संवाद आवश्यक. आरोग्य यथातथा राहील. वरिष्ठांकडून प्रोत्साहन मिळेल. जुने प्रकल्प पूर्ण होतील.
बुधवारी पांढऱ्या फुलांचे दान करा.
कर्क
या आठवड्यात 'The Star' कार्ड आशावादाचे प्रतीक आहे. जुनी स्वप्ने पूर्ण होण्याचा संभव. नोकरीत संधी मिळतील. आर्थिक स्थैर्य लाभेल. प्रेमसंबंधात नवचैतन्य येईल. आरोग्य सुधारेल. आध्यात्मिक उन्नतीचे योग आहेत. घरात आनंद वाढेल. जुने मतभेद मिटतील. नवीन गुंतवणुकीसाठी योग्य वेळ. वैचारिक स्पष्टता येईल. विद्यार्थ्यांसाठी यशस्वी काळ. सामाजिक कामात भाग घ्याल.
सोमवारी शिवलिंगावर दूध अर्पण करा.
सिंह
'Strength' कार्ड मानसिक व शारीरिक सामर्थ्य दर्शवते. तुम्ही कठीण प्रसंगांवर मात करू शकाल. आत्मविश्वासात वाढ होईल. नोकरीत मोठी संधी मिळेल पण सोबत काम करणारे जळतील. आर्थिकदृष्ट्या लाभदायक काळ. प्रेमसंबंध बळकट होतील. कौटुंबिक वातावरण सकारात्मक राहील. आरोग्य चांगले राहील. विद्यार्थ्यांनी मेहनतीला पर्याय नाही, हे ध्यानात ठेवावे.
रविवारी गूळ वाटा.
कन्या
या आठवड्यात 'The Hermit' कार्ड अंतर्मुखतेचे सूचक आहे. स्वत:च्या विचारांवर आणि अनुभवांवर विश्वास ठेवा. नोकरीत अडचणी आल्या तरी धीर आवश्यक आहे. आर्थिक व्यवहारात शहाणपण दाखवा. प्रेमसंबंधात संवाद कमी होऊ शकतो. आरोग्याच्या बाबतीत थोडे सावध रहा. अभ्यासासाठी उत्तम काळ आहे. आत्मनिरीक्षण करा. वरिष्ठांकडून दबाव येऊ शकतो.
बुधवारी मोदक दान करा.
तुळ
'Wheel of Fortune' कार्ड भाग्याच्या बदलाचे संकेत देते. अनपेक्षित आनंददायक गोष्टी घडतील. नोकरीत बढतीची शक्मयता. आर्थिक लाभ मिळेल. कौटुंबिक जीवनात आनंद वाढेल. प्रेमात नवचैतन्य येईल. प्रवासाचे योग आहेत. आरोग्य चांगले राहील. सामाजिक क्षेत्रात नाव होईल. मानसिक समाधान मिळेल. जुनी पेंडिंग कामे पूर्ण होतील.
शुक्रवारी मिठाई वाटा.
वृश्चिक
'Death' कार्ड जुने संपवून नवीन सुऊवात दर्शवते. नवे पर्व सुरू होणार आहे. नोकरीत मोठा बदल संभवतो. आर्थिक निर्णय काळजीपूर्वक घ्या. आरोग्यावर लक्ष द्या. जुन्या सवयी बदलाव्या लागतील. कुटुंबातील मतभेद मिटतील. नवीन उद्दिष्टे निश्चित करा. मानसिकदृष्ट्या तयार रहा. घरात सकारात्मक बदल. विद्यार्थ्यांसाठी नवी शैक्षणिक संधी.
मंगळवारी मसूर डाळ दान करा.
धनु
'Judgement' कार्ड तुम्हाला जुन्या कर्मांचा परिपाक मिळेल याचे संकेत देते. नोकरीत मागील कष्टांचे फळ मिळेल. आर्थिकदृष्ट्या लाभ संभवतो. कौटुंबिक बाबतीत निर्णय घ्यावा लागेल. प्रेमसंबंधात नवा अध्याय सुरू होईल. जुने संबंध पुन्हा जुळतील. विद्यार्थ्यांना यश मिळेल. आरोग्य सामान्य राहील. मनात नवे विचार येतील. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. जुन्या चुका सुधारण्याची संधी मिळेल.
गुरुवारी पिवळ्या फळांचे दान करा.
मकर
'Emperor' कार्ड तुम्हाला स्थैर्य आणि नेतृत्वाची गरज असल्याचे दर्शवते. कामात जबाबदारी वाढेल. आर्थिक बाबतीत स्थिरता येईल. नोकरीत पदोन्नतीची शक्मयता. कुटुंबात तुमचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. प्रेमसंबंधात प्रगल्भता येईल. आरोग्य सशक्त राहील. समाजात मान मिळेल. आत्मविश्वास वाढेल. जुन्या प्रकल्पांची जबाबदारी घ्यावी लागेल. नव्या कामासाठी वेळ योग्य आहे.
शनिवारी काळ्या वस्त्रांचे दान करा.
कुंभ
'High Priestess' कार्ड अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवण्याचे संकेत देते. अनेक गोष्टींचे उत्तर आपल्याकडेच आहे. नोकरीत शांतता राखा. आर्थिक बाबतीत संयम बाळगा. कौटुंबिक बाबतीत गोष्टी लपवू नका. प्रेमसंबंधात समजूतदारपणा आवश्यक. आरोग्यावर लक्ष द्या, विशेषत: निद्रानाश. आध्यात्मिक अनुभव येतील. शिक्षणासाठी चांगला काळ. जुने रहस्य उलगडेल.
शनिवारी तुळशीला पाणी अर्पण करा.
मीन
'World' कार्ड पूर्णत्वाचा अनुभव दर्शवते. तुम्ही एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. नोकरीत समाधान मिळेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. कौटुंबिक जीवन समृद्ध राहील. प्रेमात परिपूर्णता जाणवेल. आरोग्य उत्तम राहील. समाजात प्रतिष्ठा वाढेल. आत्मविश्वास गगनाला भिडेल. विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट काळ. विदेशाशी संबंधित योग संभवतो. आध्यात्मिक स्तर उंचावेल.
गुरुवारी पिवळ्या फुलांचा हार देवीला अर्पण करा.
घरात नकारात्मक शक्ती असेल, कुणी काही केले असल्याची शंका असेल, मन लागत नसेल, सतत आजारपण असेल, सारखी भांडणे होत असतील तर गाईच्या शेणाच्या तापलेल्या गोवरीवर भीमसेनी कापूर, पिवळी मोहरी, अगर, तगर, लोबान, गुग्गुळ, लसणाच्या पाकळ्या, कांद्याचे टरफल जाळावे आणि त्याचा धूर घरभर फिरवावा. हा उपाय दर मंगळवार आणि शनिवारी करावा.