कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अक्षरयात्रा राशिभविष्य

06:10 AM Oct 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष

Advertisement

कामाचा ताण पडण्याची शक्यता आहे. तणावरहित काम करण्याचा प्रयत्न करा. शांतपणाने काम केल्यास बुद्धी काम करेल. गडबड नको. कुटुंबातील व्यक्तिंची विशेषत: जोडीदाराची काळजी घ्या. सासरकडून काहीतरी फायदा होण्याची शक्यता आहे. आपल्या वाणीवर ताबा ठेवण्याची गरज आहे. त्यामुळे संयमाने वागा.

Advertisement

उपाय: हनुमान चालिसाचा पाठ करा

वृषभ

या आठवड्यात काही चांगल्या बातम्या कानावर येण्याची शक्यता आहे. धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळेल. पण प्रवास करताना सावध रहा. प्रवास छान होईल. या आठवड्यात स्वत:कडे व चैनीकडे जास्त लक्ष द्याल. हे सारे करत असताना कामाकडे मात्र दुर्लक्ष होऊ देऊ नका.

उपाय: दर शनिवारी शनिला तेल वाहून दर्शन घेऊन या.

मिथून

तुमच्या कामाचा मोबदला तुम्हाला जरुरी मिळेल. पण कोणत्याही प्रलोभनाला चुकूनही  बळी पडू नका. उद्योगधंद्यात असाल तर महत्त्वाचे निर्णय पूर्ण विचारांती घ्या. शक्य असेल तेव्हा ज्येष्ठांचा सल्ला घ्या. उपयोगी पडेल. स्थावर मालमत्तेच्या कामात काही अडथळे आले असतील तर ते मार्गी लागतील.

उपाय: गाईला खाऊ घाला

कर्क

सभा-समारंभात सहभागी होण्याची शक्यता आहे आणि तिथून तुम्हाला लाभही होण्याची शक्यता आहे. मोठ्या भावंडांच्या गाठीभेटी घडतील. मित्रपरिवाराच्या सहवासाचा आनंद मिळेल. त्यामुळे या आठवड्यात आनंदही आनंद मिळेल. पण हा आनंद लुटतानाही स्वत:वर संयम असू द्या.

उपाय: दर सोमवारी शंकराचे देवळात जाऊन दर्शन घ्या.

सिंह

या आठवड्यात काही वेळा तुम्हाला निरुत्साही वाटेल. काय करावे हे सुचेनासे होईल. पण प्रलोभनाला बळी पडू नका. परदेशगमनाचीदेखील संधी मिळेल. मग अर्थातच त्यासाठी खर्चही होण्याची शक्यता आहे. पण खर्च करताना सारासार विचार करण्याची गरज आहे. परदेशाशी काही आर्थिक व्यवहार होण्याची देखील शक्यता आहे.

उपाय- दर मंगळवारी मारुतीचे दर्शन घ्या.

कन्या

या आठवड्यात छोट्या मोठ्या कारणाने आपण भावूक व्हाल. तरी मनावर संयम ठेवा. चैनीकडे कल वाढेल. स्वत:ला सुंदर ठेवण्याचा खूप प्रयत्न कराल. चांगली गोष्ट आहे. पण त्यासाठी दुसऱ्यावर हुकूमत गाजवू नका. संयमाने रहा.

उपाय-भटक्या कुत्र्याला खाऊ घाला.

तुळ

या आठवड्यात तुमच्या वाणीचा प्रभाव सर्वांवर टाकाल. समोरच्या माणसावर तुमच्या विद्वत्तेची छाप पडेल. पण बोलण्यात नम्रता मात्र असू द्या. अचानक धनलाभाची शक्यता राहील. वडिलोपार्जित संपत्तीच्या बाबतीत काही चर्चा घरात होण्याची शक्यता आहे. त्यावेळी शब्दाला शब्द वाढू देऊ नका.

उपाय: मुंग्यांना साखर घाला.

वृश्चिक

या आठवड्यात तुमच्या पराक्रमात वाढ होण्याची शक्यता आहे. जे काम तुमच्या  हाती येईल. त्याचा तुम्ही उत्तम रिझर्ल्ट द्याल. या कामी तुम्हाला तुमच्या हाताखालील लोकांची किंवा शेजाऱ्यांची उत्तम साथ मिळण्याची शक्यता आहे. पण चांगले काम करून देण्यासाठी आटापिटा करताना तब्येतीला सांभाळा.

उपाय- काळा रंग वापरू नका.

धनु

आईच्या तब्येतीची काळजी घ्या. तिला आनंदी ठेवा. नवीन वाहन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे किंवा एखाद्या वास्तुचे स्वप्न असेल तर त्या दिशेने पाऊल उचलाल. पण जे काही कराल ते आईला विचारून तिचा आशीर्वाद घेऊन करा.

उपाय: गोमातेला खाऊ घाला.

मकर

विद्यार्थी असाल तर अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रीत करा. क्षणिक मोहाला बळी पडू नका. कामावरचे चुकून लक्ष उडाले तर महागात पडेल. जोडीदाराचे चांगले सहकार्य मिळेल. त्याचा सल्ला घ्या. एकूण आठवडा चांगला जाईल. मुलांच्या अभ्यासाकडे पण लक्ष देणे गरजेचे आहे.

उपाय: घरातून बाहेर पडताना गंध लावा.

कुंभ

मनस्तापापासून वाचण्यासाठी प्रलोभनाला बळी पडू नका. नोकरीमध्ये हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. पण कोणती तरी चिंता आपल्याला सतत भेडसावण्याची शक्यता आहे. पण चिंता शरीराला जाळते म्हणून चिंता न करता देवावर विश्वास ठेवा व स्थिर रहा.

उपाय: गुरुची आराधना करा

मीन

दैनंदिन प्राप्ती असेल तर या आठवड्यात जेमतेमच होईल. पण धैर्य सोडू नका. आणखीन चांगल्या संधी येतील. त्या संधीचा लाभ घ्या. जोडीदाराला साथ द्या. त्याच्या तब्येतीची काळजी घ्या. हा आठवडा आपल्याला जेमतेम जाईल. आपल्या अथक प्रयत्नाने परिस्थिती बदलायचा प्रयत्न करा.

उपाय: पिंपळाला पाणी घाला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article