अक्षरयात्रा राशिभविष्य
मेष
या आठवड्यात The Chariot कार्ड तुमची पुढे जाण्याची ताकद दाखवते. नोकरीत स्पर्धा वाढेल पण तुम्ही धैर्याने मार्ग काढाल. आर्थिक क्षेत्रात नवा प्रकल्प सुऊ होईल. आरोग्याच्या बाबतीत थकवा टाळा. प्रवासाचे योग येतील. जुने वाद मिटतील. आध्यात्मिक मार्गाकडे वळण्याची इच्छा होईल. मित्रांसोबत आनंदाचे क्षण घालवाल. घरात नवीन खरेदी होऊ शकते. निर्णय घेताना शांतता ठेवा.
मंगळवारी अन्नदान करा.
वृषभ
The Empress कार्ड तुमच्या आयुष्यात संपन्नता घेऊन येत आहे. घरात आनंदी वातावरण राहील. आर्थिक स्थिती स्थिर राहील आणि काही नवीन लाभ होण्याची शक्मयता आहे. स्त्री वर्गाचा पाठिंबा मोठा असेल. कुटुंबात एखादा सण वा उत्सव साजरा होईल. नोकरीत उच्च अधिकाऱ्यांची मदत मिळेल. आरोग्य सांभाळा.
शुक्रवारी धार्मिक स्थळी अगरबत्ती लावा आणि गरीब स्त्रीला गोड पदार्थ दान करा.
मिथुन
The Lovers" कार्ड या आठवड्यात तुमच्या निर्णयक्षमतेवर लक्ष केंद्रित करत आहे. प्रेमसंबंधात नवीन वळण येईल. जोडीदाराशी गप्पा मारताना गैरसमज टाळा. नोकरीत भागीदारी फायदेशीर ठरेल. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. विद्यार्थ्यांना एकाग्रतेची गरज भासेल. कुटुंबात एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल. आरोग्य स्थिर राहील पण मानसिक ताण जाणवू शकतो. नवीन मित्र बनतील.
बुधवारी तुळशीला दूध घाला.
कर्क
या आठवड्यात कार्ड The Chariot कर्क राशीला धैर्य आणि नियंत्रणाचे महत्त्व शिकवते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही आव्हाने सामोरी येऊ शकतात पण तुमच्या चिकाटीने तुम्ही ती जिंकू शकता. कौटुंबिक नात्यांमध्ये काही मतभेद निर्माण होऊ शकतात, संयम ठेवा. आर्थिक बाबतीत अनावश्यक खर्च टाळा. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ परिश्र्रम घेण्याचा आहे. आरोग्याबाबत थोडा थकवा जाणवेल.
देवीला लाल फुल अर्पण करा.
सिंह
The Sun कार्ड सिंह राशीला यश, प्रकाश आणि आत्मविश्वास देते. करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल. उच्च पदस्थ व्यक्तींचा पाठिंबा मिळू शकेल. नोकरी बदलण्याचा विचार योग्य ठरू शकतो. आर्थिक लाभ होईल पण गुंतवणुकीत सावधगिरी आवश्यक. विद्यार्थी वर्गासाठी हा आठवडा आत्मविश्वास वाढवणारा आहे. आरोग्य उत्तम राहील, मात्र डोळ्यांची काळजी घ्या.
सूर्याला जल अर्पण करा
कन्या
The Hermit कार्ड कन्या राशीला अंतर्मुख होऊन स्वत:कडे बघण्याचा संदेश देते. करिअरमध्ये काही निर्णय स्थगित करावे लागतील. व्यवसायात सावधगिरी गरजेची आहे. आर्थिक बाबतीत काटकसर करणे आवश्यक ठरेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. आरोग्याबाबत थकवा जाणवेल, विश्र्रांती घ्या. विद्यार्थी वर्गाला एकाग्रता वाढवावी लागेल. प्रेमसंबंधात दुरावा संभवतो. वैवाहिक जीवनात संवादाची कमी भासेल. मित्रांसोबत जुन्या आठवणी जाग्या होतील. प्रवास पुढे ढकलणे योग्य ठरेल. सामाजिक जीवनात जास्त उघड होऊ नका. शत्रू तुमची कमजोरी शोधण्याचा प्रयत्न करतील. संयम आणि शिस्त पाळल्यास परिस्थिती सुधारेल.
गुरुवारी भगवान विष्णूला पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करा
तूळ
आठवड्यात थकवा तसेच मानसिक तणाव जाणवू शकतो. या आठवड्यात तुम्हाला प्रत्येक स्तरावर फेरबदल करावे लागतील. तुम्ही धीर धरा आणि गोष्टींमध्ये त्यांच्या नैसर्गिक प्रक्रियेत हस्तक्षेप टाळा, आरोग्याबाबत जागरूक रहा, शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या कामातून अनपेक्षित आर्थिक लाभ मिळतील. जमीन, इमारती आणि वाहनांच्या खरेदी-विक्रीतून तुम्हाला नफा मिळू शकेल.
धार्मिक ठिकाणी तुपाचा दिवा लावा.
वृश्चिक
Death कार्ड वृश्चिक राशीसाठी बदल आणि नवी सुऊवात सूचित करते. करिअरमध्ये जुने मार्ग सोडून नवे मार्ग स्वीकारावे लागतील. व्यवसायात नवे करार आणि नवी दिशा मिळेल. आर्थिकदृष्ट्या परिस्थिती हळूहळू सुधारेल. कौटुंबिक जीवनात काही गोष्टी संपुष्टात येतील पण त्यातून नवीन सुऊवात होईल. आरोग्यात सुधारणा होईल. विद्यार्थी वर्गासाठी हा आठवडा नवे धडे शिकण्याचा आहे.
मंगळवारी लाल वस्त्र परिधान करा
धनु
या आठवड्यात Temperance कार्ड संतुलन राखण्याचा सल्ला देते. करिअरमध्ये प्रगतीसाठी संयम आवश्यक आहे. व्यवसायात भागीदारी फायदेशीर ठरेल. आर्थिक दृष्ट्या खर्चावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक जीवनात शांततेचे वातावरण राहील. आरोग्यासाठी संतुलित आहार महत्त्वाचा आहे. विद्यार्थी वर्गासाठी अभ्यासात सातत्य ठेवल्यास यश मिळेल.
जुन्या विहिरीत नाणे टाका
मकर
The Devil कार्ड बंधन व मोहांपासून सावधगिरी बाळगण्याची सूचना करते. करिअरमध्ये शॉर्टकट घेण्याचा मोह होऊ शकतो, त्यापासून लांब रहा. व्यवसायात फसवणुकीची शक्मयता असल्याने करार काळजीपूर्वक वाचा. आर्थिक बाबतीत खर्चावर नियंत्रण आवश्यक आहे. कौटुंबिक वातावरणात वाद निर्माण होऊ शकतात. आरोग्यासाठी व्यसनांपासून सावध रहा.
शनी मंदिरात तेल व काळे तीळ अर्पण करा.
कुंभ
या आठवड्यात The Star कार्ड नवी आशा आणि यशाचे संकेत देते. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. व्यवसायात नव्या प्रकल्पांना गती मिळेल. आर्थिकदृष्ट्या चांगला लाभ होईल. कौटुंबिक वातावरणात आनंद व सौख्य वाढेल. आरोग्य बरे राहील, जुन्या तक्रारी दूर होतील. मित्रांचा सहयोग लाभेल. समाजात तुमची कीर्ती वाढेल. शत्रू पराभूत होतील.
रविवारी गरीब रुग्णांसाठी औषधांची मदत करा.
मीन
या आठवड्यात The High Priestess आणि The Star ही कार्डे एकत्र आली आहेत, जी तुमच्या अंतर्ज्ञानाची आणि आशावादाची ताकद दाखवतात. तुमच्या मनात दडलेले प्रश्न हळूहळू स्पष्ट होतील. प्रेमसंबंधांमध्ये गुप्त भावना उघड होऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला धक्का बसेल पण त्यातून मार्गदर्शनही मिळेल. नोकरीत शांत राहून काम केल्यास तुमचे कौशल्य अधोरेखित होईल.
सोमवारी चंद्राला कच्चे दूध अर्पण करा
उपाय छोटे-लाभ भरपूर. अन्न नेहमी पूर्वेकडे तोंड करून खावे. असे केल्याने जीवनात आनंद मिळतो आणि धन आणि धान्याची कमतरता नसते असे म्हणतात. -जेवताना शूज किंवा चप्पल कधीही घालू नका. हा अन्नपूर्णा मातेचा अपमान मानला जातो.-घरामध्ये नियमित पूजा करून दिवा लावावा. असे केल्याने घरात देवतांचा आशीर्वाद कायम राहतो.-घरामध्ये तुळशीचे रोप असेल तर रोज संध्याकाळी त्याजवळ तुपाचा दिवा लावावा.