महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मायावतींकडून अखिलेश यादव लक्ष्य! मायावतींना इंडिया आघाडीमध्ये सपाचा विरोध

06:25 AM Jan 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ लखनौ

Advertisement

इंडिया आघाडीतील बसपच्या सहभागाबद्दल बोलताना अखिलेश यादव यांनी मायावती यांच्यावर विश्वास ठेवणे अवघड असल्याचे म्हटले होते. समाजवादी पक्ष अतिमागासांसोबत दलितविरोधी पक्ष आहे. बसपने मागील लोकसभा निवडणुकीत सपसोबत आघाडी करत त्याची दलितविरोधी वृत्ती बदलण्याचा प्रयत्न केला होता, परंतु निवडणूक संपताच सपने पुन्हा स्वत:चा दलितविरोधी जातीयवादी अजेंडा समोर आणल्याची टीका मायावती यांनी  अखिलेश यादवांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर केली आहे.

Advertisement

सप प्रमुख अखिलेश आता ज्या पक्षांसोबत आघाडीची चर्चा करत आहेत, त्यांच्यासमोर ते बसपपासून अंतर राखण्याची अट ठेवत आहेत. सपच्या 2 जून 1995 समवेत अन्य घृणास्पद कृत्यांना पाहता तसेच सप सरकार असताना दलितविरोधी घेण्यात आलेले निर्णय पाहता त्याच्यासोबत आघाडी करणे अशक्य असल्याचे वक्तव्य मायावती यांनी केले आहे.

बसपच्या राज्य कार्यालयानजीक उंच पूल तयार करण्याचे कृत्य देखील यात सामील आहे. या पूलावरून अराजक घटक पक्ष कार्यालय, कर्मचारी तसेच बसप प्रमुखाला हानी पोहोचवू शकतात. या पूलामुळे पक्षाला महापुरुषांचे पुतळे तेथून हटवत पक्षप्रमुखांच्या निवासस्थानी हलवावे लागले आहेत. तसेच असुरक्षिततेची स्थिती पक्षप्रमुखांना बहुतांश बैठका स्वत:च्या निवासस्थानीच आयोजित कराव्या लागल्या आहेत. अशा स्थितीत बसपकडून राज्य सरकारला पक्ष कार्यालय अन्य सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे आवाहन करत आहे. अन्यथा येथे कुठलाही घातपात होऊ शकतो. दलितविरोधी घटकांवर सरकारने कठोर कारवाई करावी अशी मागणी असल्याचे मायावती यांनी म्हटले आहे.

उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी बसप सर्वेसर्वा मायावती यांना सोमवारी प्रत्युत्तर दिले आहे. मायावती यांच्याकडून करण्यात आलेल्या सोशल मीडिया साइटवरील पोस्ट्ससंबंधी बोलताना अखिलेश यांनी काही लोकांचे ट्विट आम्ही वाचतच नसल्याची टिप्पणी केली आहे. तर मायावती या मागील काही दिवसापासून सप अध्यक्षांच्या विरोधात संताप व्यक्त करत आहेत. सप कार्यकाळात निर्माण करण्यात आलेल्या एका पूलामुळे उत्तरप्रदेशातील बसपच्या अनेक कार्यालयांची सुरक्षा धोक्यात आल्याचा दावा मायावती यांनी सोमवारी केला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article