For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणार अखिलेश

06:53 AM Jun 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणार अखिलेश
Advertisement

सप नेत्यांकडून पोटनिवडणुकीची तयारी

Advertisement

वृत्तसंस्था/ लखनौ

लोकसभा निवडणुकीत उत्तरप्रदेशातील 37 जागा समाजवादी पक्षाने जिंकल्या. या आश्वासक कामगिरीमुळे सपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. सप प्रमुख अखिलेश यादव हे कनौज लोकसभा मतदारसंघात विजयी झाले आहेत. तर अखिलेश मैनपुरीच्या करहलचे आमदार देखील आहेत. आता त्यांना यापैकी एकाची निवड करावी लागणार आहे. अखिलेश यादव हे विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचे मानले जात आहे. पक्षाच्या काही नेत्यांनी विधानसभा पोटनिवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

Advertisement

लोकसभा निवडणुकीतील कामगिरीनंतर समाजवादी पक्ष हा देशातील तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. संसदेत सप खासदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. यामुळे अखिलेश हे राष्ट्रीय राजकारणात सक्रीय होणार असल्याची चर्चा आहे. संसदेत पक्षाचे नेतृत्व करण्याचा त्यांचा विचार सुरु आहे. संसदेचे सदस्य म्हणून कार्यरत असताना अखिलेश याचे उत्तरप्रदेशावरील लक्ष कमी होणार नसल्याचे राजकीय जाणकारांचे मानणे आहे. विधानसभा निवडणूक राज्यात 2027 मध्ये होणार असून त्यावेळी ते पुन्हा मुख्यमंत्रिपदाचे दावेदार म्हणून लढतीत सामील होतील.

अखिलेश यादव यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला तर शिवपाल यादव, इक्बाल महमूद, इंद्रजीत सरोज यांच्यापैकी एकाची विरोधी पक्षनेते म्हणून निवड होऊ शकते.

Advertisement
Tags :

.