अखिल अक्किनेनी जैनबसोबत संसार थाटणार
नागार्जुनने भावी सुनेचे परिवारात केले स्वागत
नागा चैतन्यचा भाऊ अखिल अक्किनेनीने साखरपुडा केला आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुनने भावी सून जैनब रावदजीचे परिवारात स्वागत केले आहे. काही महिन्यांपूर्वी नागा चैतन्यने शोभिता धुलिपालासोबत साखरपुडा केला होता. दोघेही लवकरच विवाह करणार आहेत.
नागार्जुनने अखिल आणि जैनबची यांची छायाचित्रे शेअर केली आहेत. आम्ही आमचा मुलगा अखिल अक्किनेनीच्या साखरपुड्याची घोषणा करताना रोमांचित झालो आहोत. जैनबचे आमच्या परिवारात स्वागत करताना आम्ही अत्यंत आनंदी आहोत. या जोडप्याला अभिनंदन अन् आशिर्वाद द्या असे नागार्जुने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे.
अखिलची होणारी पत्नी जैनब रावदजी ही 27 वर्षांची असून ती हैदराबाद येथील रहिवासी आहे. परंतु सध्या ती मुंबईत वास्तव्यास आहे. जैनब एक प्रतिभाशाली कलाकार असून ती स्वत:च्या आकर्षक चित्रांसाठी प्रख्यात आहे. इन्स्टाग्राम हँडलवर तिचे 55 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
तर नागा चैतन्य हा शोभिता धुलिपालासोबत 4 डिसेंबर रोजी विवाह करणार आहे. हैदराबादच्या अन्नपूर्णा स्टुडिओत हा विवाहसोहळा पार पडणार आहे. तर अखिलने 2016 मध्ये उद्योजक जीव्ही कृष्ण रे•ाr यांची नात श्रिया भूपालसोबत साखरपुडा केला होता, परंतु विवाह होण्यापूर्वीच दोघांचे नाते संपुष्टात आले होते.