महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आकांक्षा, सेन्थिलकुमार उपांत्यपूर्व फेरीत

06:45 AM Apr 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारताच्या अग्रमानांकित वेलावन सेन्थिलकुमारने फ्रान्सच्या मॅटेव कॅरॉगचा सहज पराभव करून येथे पॅरिसमध्ये सुरू असलेल्या 12000 अमेरिकन डॉलर्स बक्षीस रकमेच्या पीएसए चॅलेंजर टूरवरील बॅच ओपन स्क्वॅश स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली. याशिवाय अमेरिकेतील स्प्रिंगफील्ड येथे सुरू असलेल्या एक्स्प्रेशन सेंट जेम्स ओपन स्क्वॅश स्पर्धेत राष्ट्रीय चॅम्पियन आकांक्षा साळुंखेनेही उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

Advertisement

राष्ट्रीय चॅम्पियन सेन्थिलकुमारने फ्रान्सच्या मॅटेव कॅरॉगचा 11-4, 11-6, 11-7 असा केवळ 29 मिनिटांत पराभव केला. पहिल्या फेरीत सेन्थिलकुमारला बाय मिळाला होता. त्याची पुढील लढत पाचव्या मानांकित झेक प्रजासत्ताकच्या याकुब सोलनिकीशी होईल.

अमेरिकेतील स्पर्धेत भारताच्या चौथे मानांकन मिळालेल्या आकांक्षा साळुंखेने पीएसए चॅलेंजर टूरवरील स्पर्धेत ग्वाटेमालाच्या विनिफर बोनिलाचा 11-8, 11-2, 11-9 असा 25 मिनिटांत पराभव करून आगेकूच केली. तिलाही पहिल्या फेरीत बाय मिळाला होता. तिची उपांत्यपूर्व लढत पाचव्या मानांकित युक्रेनच्या अॅलिना बुशमाशी होईल.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article