For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अजित डोवाल यांची ‘एनएसए’पदी पुनर्नियुक्ती

07:00 AM Jun 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
अजित डोवाल यांची ‘एनएसए’पदी पुनर्नियुक्ती
Advertisement

केंद्र सरकारचा निर्णय : त्यांची नियुक्ती पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळापर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत असणार 

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर अजित डोवाल यांनाही सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) बनवण्यात आले आहे. केंद्र सरकारने गुऊवारी माजी आयपीएस अधिकारी अजित डोवाल यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांची नियुक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळापर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत असणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. डोभाल हे 1968 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून दहशतवादविरोधी यंत्रणा आणि आण्विक समस्यांमधील तज्ञ आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू सहकारी म्हणूनही त्यांनी गणना केली जाते.

Advertisement

मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने 10 जून 2024 पासून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून निवृत्त आयपीएस अधिकारी अजित डोवाल यांच्या नियुक्तीला मान्यता दिल्याचे कार्मिक मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांच्या पदाच्या कार्यकाळात डोवाल यांना प्राधान्यक्रमाच्या सारणीमध्ये पॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला जाईल, असेही त्यात म्हटले आहे. त्यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्थी स्वतंत्रपणे सूचित केल्या जातील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.