महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मंत्री अजय तावरेच्या खिशात...तर मुश्रिफांच्या पायावर डोकं ठेवणार; सरकार भ्रष्टाचाराने डबडबलयं; रविंद्र धंगेकरांचा कोल्हापूरातून निशाणा

06:26 PM May 31, 2024 IST | Abhijeet Khandekar
Ravindra Dhangekar Ajay Taware Hasan Mushrif
Advertisement

पुण्यातील पब संस्कृती बंद केली तर हसन मुश्रीफ यांची माफिच काय तर मी त्यांना लोटांगण घालीन. तसेच हे सरकार भ्रष्टाचाराने डबडबलं असून अजय तावरे सारखा डॉक्टर सरकारमधील मंत्री आपल्या खिशात घेऊन फिरतो. शरद पवार यांच्या सारख्या पितृतुल्य नेत्याला सोडून सरकारमध्ये जाणाऱ्या हसन मुश्रीफांनी मला धमकी देऊ नये असं थेट आव्हान काँग्रेसचे पुण्याचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी कोल्हापूरातून लगावला आहे.

Advertisement

[embedyt] https://www.youtube.com/watch?v=5xFp2uNWLz8[/embedyt]

Advertisement

पुण्यातील हिट आणि रन प्रकरणानंतर चर्चेत असलेले काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर हे आज सकाळी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. आज सकाळी त्यांनी करविर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन माध्यमांशी संवाद साधला. हिट अँड रन प्रकरणामध्ये ससूनचे डीन विनायक काळे यांनी पत्रकार परिषदेत हसन मुश्रिफांचे नाव घेतल्याने मोठी खळबळ माजली. त्याचाच आधार घेऊन आमदार रविंद्र धंगेकर सातत्याने सरकारवर आणि त्याच अनुषंगाने वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांवर आरोप करत आहेत. त्यातच आज सकाळी रविंद्र धंगेकर कोल्हापूरामध्ये आल्याने आज ते कोल्हापूरातून काय बोलणार आहेत याची उत्सुकता लागून राहीली होती.

...तर मुश्रीफांच्या पायावर डोकं ठेवणार
आजच्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्राचे वैद्यकिय शिक्षम मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला. धंगेकरांनी आपली माफी मागावी अन्यथा मी अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असे आव्हान हसन मुश्रीफ यांनी दिले होते. पत्रकारांनी याबाबत छेडले असता ते म्हणाले, "पितृतुल्य असणाऱ्या शरद पवारांना सोडून ज्या पद्धतीने हसन मुश्रीफांना सरकारमध्ये नेलं आहे त्या हसन मुश्रिफांनी मला धमकी देऊ नये. मी सामान्य जनतेचा आवाज आहे तसेच मी मुश्रीफांचाही आवाज आहे. कारण त्यांनाही नाईलाजाने सरकारमध्ये सामिल व्हावं लागलं आहे."असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना हसन मुश्रीफांनी पुण्यातील पब संस्कृती बंद केल्यास पायावर फक्त डोकं ठेवणार नाही तर त्यांना लोटांगण घालणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

मंत्री शंभुराज देसाई हक्कभंगाची कारवाई करणार असल्याचं त्यांना सांगितल्यावर ते म्हणाले एव्हढच सांगू इच्छितो कि मी शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने जाणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी कोणाला घाबरत नाही.ज्यांना हक्कभंगाची कारवाई करायची आहे त्यांनी आवश्य करावी पण मी घाबरणारा नाही.

सरकारमधील मंत्री अजय तावरेच्या खिशात
ससून रुग्णालयातील वादग्रस्त अधिक्षक डॉ. अजय तावरे यांच्या निवडीवर यापुर्वी आमदार रविंद्र धंगेकर यांनी प्रश्न उपस्थित करून मंत्री हसन मुश्रीफ यांच्या भुमिकेवर प्रश्न निर्माण केले. अजय तावरेवर कारवाई का होत नाही असाही त्यांनी सवाल केला. अजय तावरे यांच्यावर कारवाई करायची असेल तर हे प्रकरण फास्ट ट्रॅकमध्ये नेलं पाहीजे. पण सरकारमधील काही माणसं हे करत नाहीत कारण डॉ. अजय तावरे हे सरकारमधील मंत्री खिशात घेऊन फिरतो अशी जळजळीत टिका त्यांनी हसन मुश्रीफांवर केली.

सरकार भ्रष्टाचारानं डबडबलंय़...
आपल्या कोल्हापूरच्या दौऱ्यामध्ये त्यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. सरकारच्या प्रत्येक विभागामध्ये भ्रष्टाचार सुरु असून त्यावर कोणाचा अंकुश राहीला नाही. तानाजी सावंत सारखा भ्रष्ट मंत्र्याने आपल्या सोईनुसार आपापली माणस भरली असून त्यांच्याकडून भ्रष्टाचार करत आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.

 

Advertisement
Tags :
Ajay Tawarehasan mushrifkolhapurRavindra Dhangekar
Next Article