महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अजय जडेजा आणि दत्ता मिठबावकर यांचा स्वप्न साकार झालं!

06:07 AM Jun 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आज स्पर्धेचे दोन महत्त्वपूर्ण सामने बघायला मिळतील. त्यापैकी पहिला सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यामध्ये खेळवला जाईल. अर्थात ज्यावेळी हा लेख तुम्ही वाचत असाल त्यावेळी त्याचा कदाचित निकालही आला असेल. या चार संघापैकी इंग्लंडला उपांत्य फेरीची लॉटरी लागली आहे. शेवटी क्रिकेटमध्ये तुम्ही सामना कसा जिंकला यापेक्षा तुम्ही जिंकलात हे महत्त्वाचं असतं. या विश्वचषक स्पर्धेने ख्रया अर्थाने ऑस्ट्रेलियाची जिरवली. दुस्रया बाजूने अफगाणिस्तान संघ हा बलवान संघ म्हणून पूर्ण स्पर्धेत वावरताना दिसला. अफगाणिस्तान साठी त्यांचा संघ उपांत्य फेरीत दाखल होणं ही निश्चितच त्यांच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. अफाट प्रयत्नांना अखेर यश आलंय. अर्थात यामागे अजय जडेजा आणि सिंधुदुर्ग चे सुपुत्र दत्ता मिठबावकर यांचाही मोलाचा वाटा आहे. कर्णधार राशीद खानने याचा उहापोह आपल्या एका मुलाखतीत काल परवा केला होता. दत्ता मीठबावकरांनी प्रथम लायझनिंग ऑफिसर आणि त्यानंतर मॅनेजरची भूमिका समर्थपणे वठवली.  दोन-तीन महिन्यापूर्वी मी दत्ता मिठबावकरांशी अफगाणिस्तान संघाबद्दल चर्चा करत होतो. निमित्त होतं रामेश्वर प्रतिष्ठान मिठबाव लीगचं,त्यावेळी त्यांच्यासोबत क्रिकेट खेळलेले त्यांचे सहकारी उदय रूमडे, सुधीर साटम आणि विजय जोईल उपस्थित होते.  त्यावेळी ते म्हणाले होते की अफगाणिस्तान संघाचे भविष्य उज्वल आहे. त्यांचे हे म्हणणं काल-परवा खरं ठरलं. एकंदरीत अजय जडेजा आणि दत्ता मिठबावकर यांनी घेतलेल्या अथक परिश्रमाना अखेर यश आले असेच म्हणावे लागेल. अफगाणिस्तान देश हा काबुली चणा आणि सुकामेवा यासाठी प्रसिद्ध आहेच. परंतु एखादा संघ क्रिकेटमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू कसा ठरावा याचा परिपाठच जणू अफगाणिस्तान संघाने घालून दिला. आठ नऊ महिन्यापूर्वी झालेल्या अफगाणिस्तान मधील भूकंप, त्यातून संघातील झालेली ओढाताण  सहन करून त्यांची ही कामगिरी निश्चितच दृष्ट लागण्यासारखीच.

Advertisement

आज दुसरा सामना आहे तो ग्रोयांशी.अर्थात इंग्लंडने मागच्या विश्वचषक स्पर्धेत  उपांत्य फेरीत भारताला अक्षरश: लोळवलं होतं. त्याचीच उट्टे काढण्याची नामी संधी आता भारताला आली आहे. परंतु इंग्लंडच्या संघाचा विचार केला तर इंग्लंड हा पक्का व्यावसायिक संघ आहे. काउंटि क्रिकेट हा त्याचा पाया आहे. आजकाल भारतामध्ये एक कसोटी किंवा एक वन डे क्रिकेट काय खेळला तर लगेच तो खेळाडू रणजी क्रिकेट कडे पाठ फिरवतो. परंतु इंग्लंडमध्ये तसं घडताना दिसत नाही.

Advertisement

दोन्ही संघांचा विचार केला तर आतापर्यंत दोन्ही संघ 23 वेळा आमने सामने ठाकले आहेत. विजयाचे प्रमाण दोन्ही संघांचे जवळपास 50-50ज्ञ्. दोन्ही संघाच्या सलामी वीरांचा विचार केला तर रोहित शर्माला ब्रयापैकी फॉर्म सापडलाय. तर दुसरीकडे इंग्लंडचा सॉल्ट आपल्या संघासाठी मिठासारखा जागतोय. दुसरीकडे भारतीय संघाचा मध्यम क्रम फलंदाज सूर्यकुमार यादव हा प्रत्येक वेळी तारणहार ठरतोय. ज्या ज्या वेळी संघ अडचणीत येतोय त्यावेळी  संघाला तारून नेतोय. तसेच ऋषभ पंतने आपल्या वेडेवाकड्या फाटक्यानवरती नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. कारण फालंदाजातील एक दोन मोठया चुका होत्याच न्हवतं करण्यास पुरेसे आहे. दुस्रया बाजूने आपले मंद गती गोलंदाज आणि वेगवान गोलंदाज चांगलीच कामगिरी करतील एवढी मात्र आपण निश्चितच अपेक्षा करू शकतो. या स्पर्धेत भारतीय संघाने अपेक्षे पेक्षा भरीव कामगिरी केली आहे ग्रुप स्टेजचा सामान्यात आणि सुपर एट मध्ये तुम्ही एखादा पराभव पचवू शकता. इथे मात्र तस नाही आहे. इथे तुम्हांला जिंकायचच आहे आणि तेही दिमाखदार पद्धतीने. अपेक्षा करूया उद्याचे दोन्ही सामने रंगतदार होतील तोपर्यंत चारही संघास शुभेच्छा!

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article