कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अजय देवगणचा ‘रेड 2’ लवकरच

06:53 AM Apr 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Advertisement

अजय देवगणचा आगामी चित्रपट ‘रेड 2’बद्दल त्याच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. निर्मात्यांनी आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये प्राप्तिकर अधिकारी अमय पटनायकच्या व्यक्तिरेखेत यावेळी अजय कुठल्या बाहुबली नेत्याच्या घरावर छापा टाकणार हे दाखविण्यात आले आहे.

Advertisement

2018 मध्ये प्रदर्शित चित्रपट ‘रेड’चा सीक्वेल म्हणून आता प्राप्तिकर अधिकारी अमय पटनायकची (अजय देवगण) बदली दुसऱ्या शहरात करण्यात आल्याचे दाखविण्यात आले असून तेथे तो स्वत:च्या कारकीर्दीतील 75 वी रेड राज्यातील एका बाहुबली नेत्याच्या घरावर टाकत असल्याचे यात दिसून येणार आहे.

या बाहुबली नेत्याचे नाव दादा मनोहर भाई (रितेश देशमुख) आहे. अमय स्वत:च्या सरकारी टीमसोबत त्याच्या घरी छापा टाकतो, परंतु त्याच्या टीमला काहीच सापडत नसल्याचे ट्रेलरमध्ये दिसून येते. तर दुसरीकडे ट्रेलरमध्ये दादाभाईचा भौकाल दिसून येत आहे.

7 वर्षांपूर्वी रेड हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता, या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळाले होते.  आता रेड 2 देखील चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. 1 मे रोजी हा चित्रपट जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article