अजय बाबू 16 व्या स्थानी
वृत्तसंस्था / फोर्ड (नॉर्वे)
विश्व वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत महिलांच्या विभागात भारताच्या मीराबाई चानुने रौप्य पदक मिळविल्यानंतर भारताच्या पुरूष वेटलिफ्टिर्सनी साफ निराशा केली. राष्ट्रकुल स्पर्धेतील चॅम्पियन वेटलिफ्टिर अजय बाबू वेलुरीला 16 व्या स्थानावर समाधान मानावे लागले.
पुरूषांच्या 79 किलो गटात 20 वर्षे अजय बाबूने स्नॅचमध्ये 146 किलो तर क्लिन आणि जर्कमध्ये 177 किलो असे एकूण 323 किलो वजन उचलले. पण त्याला या वजन गटात 16 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. या वजन गटात विविध देशांचे 39 स्पर्धकांनी आपला सहभाग दर्शविला होता. गेल्या ऑगस्टमध्ये अहमदाबाद येथे झालेल्या राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत अजय बाबूने एकूण 335 किलो वजन उचलत सुवर्णपदक मिळवून घेतले. भारताच्या अजित नारायण आणि सेरम निरुपमादेवी यांना अनुक्रमे पुरूषांच्या 71 किलो वजन गटात आणि महिलांच्या 63 किलो वजन गटात नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले. थायलंडच्या विचुमाने एकूण 346 किलो वजन उचलत सुवर्णपदक तर जपानच्या मेसानोरीने रौप्य आणि चीनच्या युजीने कांस्यपदक मिळविले.