महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नववधूकडून पाळली जाते अजब परंपरा

07:00 AM Oct 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पायाने ढकलते जेवणाचे ताट

Advertisement

भारतात विवाह असो किंवा सण प्रत्येक समुदायाच्या स्वत:च्या परंपरा आणि प्रथा आहेत. या परंपरा पार पाडण्याची पद्धत वेगवेगळी असते. देशात अनेक समुदाय आहेत. याचपैकी एक आहे थारू समुदाय आहे. हा समुदाय उत्तराखंड, उत्तरप्रदेश, बिहार आणि नेपाळमध्येही वास्तव्यास आहे. या समुदायात महिलांना पुरुषांपेक्षा अधिक वरचढ स्थान अन् दर्जा प्राप्त आहे. थारू समुदायत एखाद्याचा विवाह झाल्यावर नववधू पहिल्यांदा सासरी स्वयंपाक करते, त्यावेळी खास परंपरा पार पाडली जाते. यावेळी नववधू अत्यंत अजबपणे स्वत:च्या पतीला जेवण देते. सर्वसाधारणपणे हा प्रकार लोक नाराज होऊ शकतात, परंतु तेथे ही परंपरा अत्यंत आनंदाने पार पाडली जाते.

Advertisement

वधूला जेवणाचे ताट हाताने नव्हे तर पायांनी ढकलून पतीला द्यावे लागते. ही प्रथा पती देखील प्रेमाने पार पाडतो. वधूने जेवणाचे ताट पायाने ढकलल्यावर वधू ते ताट स्वत:च्या डोक्याला लावतो. त्यानंतरच जेवत असतो. या प्रथेला ‘अपना पराया’ म्हटले जाते. थारू समुदायात विवाहानंतर होणाऱ्या प्रथेला ‘चाल़ा म्हटले जाते. चंपारण्य, नैनीताल, उधमसिंह नगर, लखीमपूर खीरीमध्ये थारू समुदायाचे लोक सर्वाधिक संख्येत राहतात. याचबरोबर नेपाळच्या एकूण लोकसंख्येत या समुदायाची हिस्सेदारी 6-7 टक्के आहे. उत्तराखंडमध्ये कुमाऊं क्षेत्राच्या अनेक गावांमध्ये या समुदायाचे वास्तव्य आहे. हे लोक जंगल, पर्वत, नद्यांच्या भागात स्वत:चे घर निर्माण करून राहतात. थारू या शब्दाची उत्पत्ती राजस्थानच्या थार वाळवंटात राहणाऱ्या लोकांमुळे झाल्याचे बोलले जाते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article