For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऐश्वर्या रायने दिल्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

03:14 PM Nov 21, 2024 IST | Radhika Patil
ऐश्वर्या रायने दिल्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Aishwarya Rai wishes her beloved daughter a happy birthday
Advertisement

मुंबईः
बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हीने तिच्या लाडक्या लेकीला म्हणजे आराध्या बच्चन हिला नुकत्याच सोशल मिडीयावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आराध्याचा १३ वा वाढदिवस आहे आणि तु आता ऑफिशली एक टीन एजर झाली आहेस, तुला खूप खूप शुभेच्छा अशा पद्धतीचे संदेश ऐश्वर्याने तिच्या इन्स्टाग्रामवरून दिला आहे. "माझ्या आयुष्यातील दोन प्रिय व्यक्ती बाबा आणि तु, तुम्हाला दोघांनाही खूप शुभेच्छा." असा मेसेज या पोस्टमध्ये आहे.

Advertisement

आराध्याने हा वाढदिवस आजी सोबत साजरा केला आहे. या इन्स्टपोस्टमध्ये ऐश्वर्या राय, आराध्यासह तिची आजी आणि इतर कुटुंबिय दिसत आहेत. पण या पोस्टमध्ये अभिषेक बच्चन नसल्यामुळे चर्चेला अजुन उधाण आलेलं आहे.

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटावर अनेक दिवस चर्चा सुरु आहे. त्या ऐश्वर्याच्या या पोस्टमध्ये अभिषेक बच्चन दिसत नसल्यामुळे पुन्हा एकदा यांच्या घटस्फोटाच्या चर्चेने रंगत घेतली.

Advertisement

Advertisement
Tags :

.