For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऐश्वर्या मिश्राला कांस्यऐवजी रौप्य पदक

06:33 AM Apr 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
ऐश्वर्या मिश्राला कांस्यऐवजी रौप्य पदक
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

2023 साली झालेल्या आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताची अव्वल महिला धावपटू ऐश्वर्या मिश्राने महिलांच्या 400 मी. धावण्याच्या शर्यतीत कास्य पदक मिळविले होते. दरम्यान या स्पर्धेत या क्रीडा प्रकारात उझ्बेकच्या फरिदा सोलियेव्हाने दुसरे स्थान व रौप्य पदक मिळविले होते. या स्पर्धेनंतर घेण्यात आलेल्या उत्तेजक चाचणीत (डोपींग टेस्ट)  सोलियेव्हा दोषी ठरल्याने तिला आपले पदक परत करावे लागले. आता मिश्राला या क्रीडा प्रकारात दुसऱ्या स्थानासह रौप्यपदक विजेती म्हणून घोषित करण्यात आले.

उझ्बेकच्या फरिदाला उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यानंतर एआययूने तिच्यावर तीन वर्षांची बंदी घातली. या बंदीच्या कालावधीला 13 सप्टेंबर 2023 पासून प्रारंभ झाला आहे. आशियाई चॅम्पियनशीप क्रीडा स्पर्धेत फरिदाने महिलांच्या 400 मी. धावण्याच्या शर्यतीत 52.95 सेकंदाचा अवधी घेत रौप्य पदक तर मिश्राने 53.07 सेकंदाचा अवधी घेत कास्य पदक मिळविले होते. लंकेच्या नदीशा रामनायकेने या क्रीडा प्रकारात 52.61 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक पटकाविले होते. या स्पर्धेमध्ये भारताने दर्जेदार कामगिरी करताना 6 सुवर्णासह एकूण 27 पदाकांची कमाई करत तिसरे स्थान मिळविले होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.