कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

5 जी स्पेक्ट्रमसाठी एअरटेलचा अदानींशी करार

06:22 AM Apr 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सहा सर्कल्समध्ये होणार कंपनीला फायदा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 

Advertisement

खासगी क्षेत्रातील दूरसंचार कंपनी भारती एअरटेलने बुधवारी घोषणा केली की, त्यांनी अदानी डेटा नेटवर्क्स लिमिटेड (एडीएनएल) कडून 26 जीएचझेड बँडमध्ये 400 एमएचझेड टेलिकॉम स्पेक्ट्रम वापरण्याचे अधिकार मिळवले आहेत. एअरटेल आणि त्यांची उपकंपनी भारती हेक्साकॉम लिमिटेडने अदानी एंटरप्रायझेसची उपकंपनी असलेल्या अदानी डेटा नेटवर्क्स लिमिटेडशी एक करार केला आहे.

अदानी डेटा नेटवर्क्सने 2022 च्या 5जी स्पेक्ट्रम लिलावात 212 कोटी रुपयांना 26 जीएचझेड बँड एअरवेव्ह खरेदी केले होते. व्यवहार पूर्ण करणे मानक अटी (स्पेक्ट्रम ट्रेडिंग मार्गदर्शक तत्त्वांमध्ये निर्दिष्ट केलेल्या अटी) आणि वैधानिक मंजुरींच्या अधीन आहे, असे एअरटेलने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.

कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की एअरटेलच्या होल्डिंगमध्ये समाविष्ट होणारा स्पेक्ट्रम 6 टेलिकॉम सर्कलमध्ये पसरलेला आहे. यामुळे या क्षेत्रांमध्ये त्यांच्या 5जी सेवा मजबूत करण्यास टेलिकॉम कंपनीला मदत होईल. गेल्या काही वर्षांत, 26 जीएचझेड बँड (24.25 ते 27.5 जीएचझेड) बँडने सर्व टेलिकॉम कंपन्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

उदाहरणार्थ, या बँडमधील एकूण प्रस्तावित स्पेक्ट्रमपैकी 72 टक्के स्पेक्ट्रमला 2022 च्या स्पेक्ट्रम लिलावात बोली देण्यात आल्या होत्या. तथापि, रिलायन्स जिओ आणि एअरटेल दोघांनीही त्यावेळी प्रस्तावित बँडचा मोठा वाटा आधीच खरेदी केला होता. त्यामुळे 2024 च्या स्पेक्ट्रम लिलावात कोणताही खरेदीदार सापडला नाही.

5 जी ग्राहकांच्या वेगाने वाढणाऱ्या संख्येसह, भारती एअरटेलने गेल्या वर्षी जूनमध्ये 5जी ट्रॅफिकमधील प्रचंड वाढीला पूर्ण करण्यासाठी त्यांच्या मिड-बँक स्पेक्ट्रमचा पुनर्वापर करण्यास सुरुवात केली होती. देशभरातील 1800, 2100, 2300 मेगाहर्ट्झ सारख्या मिड बँडमध्ये टेलिकॉम कंपनीचे स्पेक्ट्रम होल्डिंग 5जी सेवांसाठी पुन्हा तयार केले जाईल.

ब्राउझिंग स्पीड वाढणार

हा बँड खाजगी वापराच्या नेटवर्कसाठी किंवा एखाद्या एंटरप्राइझद्वारे अंतर्गत वापरासाठी डिझाइन केलेल्या 5जी नेटवर्कसाठी आवश्यक असल्याचे म्हटले जाते. 2022 मध्ये अदानी डेटा नेटवर्क्सने पुढाकार घेतला. त्यावेळी कंपनी ते वापरू शकली नाही. कंपनीने पूर्वी म्हटले होते की ती तिच्या ऑपरेशन्ससाठी खासगी 5जी नेटवर्क तयार करण्याची, एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित करण्याची योजना  आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article