दाट धुक्यामुळे विमानसेवा प्रभावित
दिल्लीत 300 हून अधिक विमानो•ाणांना विलंब : 31 भागात प्रदूषण गंभीर श्रेणीत
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
दिल्लीतील हवेची गुणवत्ता गुऊवारी गंभीर श्रेणीत पोहोचली. गुऊवारी सकाळी 6 वाजता दिल्लीतील 31 भागात प्रदूषण सर्वसामान्य पातळीवरून गंभीर श्रेणीत पोहोचले. जहांगीरपुरीमध्ये सर्वाधिक हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) 567 नोंदवला गेला. तर पंजाबी बागेत 465 आणि आनंद विहारमध्ये 465 एक्यूआयची नोंद झाली आहे. धुक्मयामुळे दिल्ली विमानतळावर 300 हून अधिक उ•ाणांना विलंब झाला. गुऊवारी दुपारपर्यंत 115 उ•ाणे दिल्लीत आली आणि 226 उ•ाणे रवाना झाली. यादरम्यान आगमनात 17 मिनिटे आणि प्रस्थानाला 54 मिनिटे उशीर झाल्याचे दिसून आले. दाट धुक्मयामुळे बुधवारी आयजीआय विमानतळावर 10 उ•ाणे वळवण्यात आली. दिल्ली विमानतळ प्राधिकरणाने ‘एक्स’ या सोशल मीडिया पोर्टलवर माहितीही जारी केली आहे. त्यानुसार विमानतळावर दृश्यमानता कमी असल्यामुळे प्रवाशांनी वेळोवेळी संबंधित एअरलाईन्सकडून फ्लाइटचे आगमन आणि निर्गमन याबाबतचे अपडेट्स घ्यावेत, असे सूचित केले आहे.
अन्य राज्यांमध्येही दाट धुक्याची चादर
हवामान विभागाने उत्तरेकडील राज्यांमध्ये पुढील काही दिवस दाट धुके पसरण्याचा इशारा दिला आहे. त्यानुसार, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये 15 नोव्हेंबरपर्यंत आणि हिमाचलमध्ये 18 नोव्हेंबरपर्यंत रात्री आणि सकाळच्या वेळी दाट ते खूप दाट धुके राहील. तसेच हरियाणा, पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार, झारखंडमध्ये 16 नोव्हेंबरपर्यंत धुके पडण्याची शक्मयता आहे. बुधवारी महाराष्ट्रातील विदर्भात सर्वात कमी किमान तापमान 11.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले होते.
धुक्मयामुळे अपघातांमध्ये वाढ
विमानसेवेसोबतच रस्ते आणि रेल्वे प्रवासावरही धुक्यामुळे विपरित परिणाम झालेला दिसून येत आहे. हरियाणाच्या रोहतकमध्ये दृश्यमानता 20 मीटरपर्यंत कमी झाल्यामुळे अनेक गाड्यांना उशीर झाला. 5 ठिकाणी झालेल्या अपघातात 9 वाहनांचे नुकसान झाले. पंजाबमधील ट्रक चालक धर्मेंद्र यांचा कैथलमध्ये मृत्यू झाला. दिल्लीतून देशाच्या अन्य भागात निघालेल्या रेल्वेगाड्यांचे वेळापत्रकही काहीसे कोलमडले आहे.
दिल्लीत थंडीची चाहूल
राजधानी दिल्लीमध्ये किमान तापमानात घसरण झाली असून बोचऱ्या थंडीची चाहूल सुरू झाली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत दिल्ली एनसीआरमध्ये किमान तापमानात घट झाली आहे. तापमान घसरल्यामुळे लोकांना थंडी जाणवू लागली आहे. पुढील काही दिवस राजधानीत असेच वातावरण राहणार आहे. साहजिकच, थंडी, धुके आणि प्रदूषणाचा तिहेरी फटका दिल्लीकरांना सहन करावा लागणार आहे. या बदलत्या वातावरणात लहान मुलांची योग्य काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.