महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बेळगावमधून गोवा, हुबळी, हैदराबादला विमानसेवा

11:34 AM Oct 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हिवाळी वेळापत्रकात नवीन फेऱ्यांचा समावेश

Advertisement

बेळगाव : बेळगाव व गोवा या दोन्ही शहरांमध्ये व्यापार, उद्योग, पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. बेळगावमधून गोव्याला जाण्यासाठी रस्ते मार्गाने किमान 3 तास कालावधी लागतो. परंतु आता विमानाने बेळगावहून गोवा तसेच हुबळी व हैदराबादला जोडले जाणार आहे. फ्लाय 91 या विमान कंपनीने या तिन्ही शहरांना बेळगावमधून विमानफेरी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. डीजीसीएने हिवाळी वेळापत्रक जाहीर केले असून त्यामध्ये गोवा येथील फ्लाय 91 या विमान कंपनीने बेळगावमधून तीन शहरांना सेवा देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता बेळगाव ते गोवा, बेळगाव ते हुबळी व बेळगाव-हैदराबाद असा प्रवास करता येणार आहे. गोव्याच्या मोपा विमानतळापर्यंत ही सेवा दिली जाणार आहे. 16 नोव्हेंबरपासून या सेवा सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु अद्याप कंपनीने आपल्या वेबसाईटवर बेळगावची माहिती समाविष्ट केलेली नाही. ही विमानफेरी सुरू झाल्यास बेळगावमधून हैदराबादला जाण्यासाठी आणखी एक विमान उपलब्ध होईल. तसेच गोव्याला पोहोचणेही सोयीचे ठरणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article