महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

एअर टर्बुलेन्समुळे विमान प्रवाशाचा मृत्यू

06:01 AM May 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लंडनहून सिंगापूरकरता झेपावले होते विमान

Advertisement

वृत्तसंस्था/ सिंगापूर

Advertisement

खराब हवामानामुळे लंडनहून सिंगापूरसाठी उ•ाण केलेल्या सिंगापूर एअरलाईन्सच्या विमानात गंभीर टर्बुलेन्समुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 3 प्रवासी जखमी झाले आहेत. सिंगापूर एअरलाईन्सची फ्लाईट एसक्यू321 हीथ्रो विमानतळावरून सिंगापूरच्या दिशेने उ•ाण करत असताना टर्बुलेन्सला तोंड द्यावे लागले. यामुळे विमानाला बँकॉकमध्ये आपत्कालीन लँडिंग करावे लागले आहे.

बोइंग 777-300ईआर विमान 211 प्रवासी आणि चालक दलाच्या 18 सदस्यांसोबत लंडनहून सिंगापूरकरता झेपावले होते. विमानातील सर्व प्रवासी आणि चालक दलाला शक्य ती सर्व मदत करणे आमची प्राथमिकता आहे. आवश्यक वैद्यकीय मदत प्रदान करण्यासाठी थायलंडमधील स्थानिक अधिकाऱ्यांसोबत काम करत आहोत. तसेच बँकॉकमध्ये एक पथक पाठवित आहोत असे सिंगापूर एअरलाईन्सकडून सांगण्यात आले.

उ•ाणादरम्यान विमानावर पडणारा हवेचा दाब आणि त्याच्या वेगात झालेल्या अचानक बदलाला एअर टर्बुलेन्स म्हटले जाते. यामुळे विमानाला झटका बसतो आणि ते हवेत हेलकावे घेऊ लागते. एअर टर्बुलेन्समध्ये विमानातील प्रवाशांना किरकोळ झटक्यांपासून मोठे झटके बसू शकतात. अशा स्थितीत विमानावर नियंत्रण मिळविणे अत्यंत अवघड असते, यामुळे विमान दुर्घटनाही होण्याची शक्यता असते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article