महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

एच125 हेलिकॉप्टरची भारतात निर्मिती करणार एअरबस

06:33 AM Jul 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एफएएल साइट्सचे यंदा होणार भूमिपूजन : 8 ठिकाणांपैकी एकाची होणार निवड

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

जागतिक स्तराची विमान कंपनी एअरबसने आतापर्यंत तीन ठिकाणी स्वत:ची अंतिम असेंबली लाइन स्थापन केली आहे. अंतिम असेंबली लाइनचा अर्थ कंपनी जेथे स्वत:च्या एच125 हेलिकॉप्टरची निर्मिती करते. कंपनीची एच125 साठी चौथी असेंबली लाइन (एफएएल) सुरू केली जाणार असून तेथे प्रारंभी वर्षाला 10 हेलिकॉप्टर्स निर्माण करण्यात येणार आहेत. मागणीनुसार ही निर्मितीक्षमता वाढविली जाणार आहे. ही असेंबली लाइन भारतात स्थापन केली जाणार असल्याचे समजते.

भारत हेलिकॉप्टर्ससाठी भविष्याची बाजारपेठ आहे. सद्यकाळात तेथील बाजारपेठ सध्या प्रारंभिक अवस्थेत आहे, संभाव्य शक्यतांच्या तुलनेत याचा विस्तार अत्यंत छोटा आहे. एफएएलसाठी भूमिपूजन सोहळा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात होण्याची अपेक्षा आहे. तसेच ही एफएएल सुविधा 2026 मध्ये कार्यान्वित होणार आहे. तर हेलिकॉप्टर्सचा पुरवठा 2026 च्या अखेरीस सुरू होईल अशी माहिती एअरबस हेलिकॉप्टरच्या व्यापार विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष ओलिवियर माइकलॉन यांनी दिली आहे.

मागणीनुसार वाढणार निर्मितीकार्य

आम्ही 8 ठिकाणांची ओळख पटविली असून सध्या आम्ही त्यांचे मूल्यांकन करत आहोत. औद्योगिक घडामोडी, रसद, कर्मचारी आणि नियमनासाठी सर्वात उपयुक्त ठिकाणाची आम्ही निवड करणार आहोत. 10 हेलिकॉप्टर्सची निर्मिती फार मोठी नाही, परंतु बाजारपेठेच्या मागणीच्या आधारावर काही वर्षांमध्ये हे प्रमाण वार्षिक 20, 30 किंवा 50 वर पोहोचू शकते असे ओलिवियर माइकलॉन यांनी म्हटले आहे.

एच125 ची मागणी वाढणार

आम्ही हेलिकॉप्टर तयार करतो, त्याची विक्री करतो. आता आम्ही मेक इन इंडिया अंतर्गत याची निर्मिती करणार आहोत असे त्यांनी सांगितले आहे. एअरबसने पुढील 20 वर्षांमध्ये भारत आणि शेजारी देशांमध्ये एच125 हेलिकॉप्टर्सची मागणी 500 वर पोहोचण्याचा अनुमान व्यक्त केला आहे. याचबरोबर एअरबस गुजरातच्या वडोदरामध्ये सी295 विमानासाठी  एफएएल स्थापन करत असल्याचे एअरबस हेलिकॉप्टरचे भारतातील प्रमुख सनी गुगलानी यांनी सांगितले.

सर्वाधिक विकले जाणारे हेलिकॉप्टर

मॅरिग्नेन हे एअरबस हेलिकॉप्टरचे मुख्यालय आहे. तर एअरबससाठी एच125 हे भारतासोबत दक्षिण आशिया क्षेत्रात सर्वाधिक विकले जाणारे हेलिकॉप्टर आहे. या हेलिकॉप्टरमधून 6 जण प्रवास करू शकतात. भारत आणि दक्षिण आशियात जवळपास 350 नागरी वापराची हेलिकॉप्टर्स आहेत. यातील 250 पेक्षा कमी हेलिकॉप्टर्स भारतात सेवेत आहेत. भारतात सुमारे 100 एअरबस हेलिकॉप्टर्स असून यातील बहुतांश एच125 आणि 130 प्रकारातील आहेत. जगभरात 7200 पेक्षा अधिक एच125 हेलिकॉप्टर उड्डाण करत आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article