महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

एअर मार्शल नागेश कपूर यांची सांबरा एअरफोर्स स्टेशनला भेट

12:29 PM Sep 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : एअर मार्शल नागेश कपूर (एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ) यांनी सांबरा येथील एअरफोर्स स्टेशनला व विजापूर येथील सैनिक स्कूलला भेट दिली. दोन्ही ठिकाणी प्रारंभी त्यांना छात्रांनी मानवंदना दिली. त्यानंतर त्यांनी स्मारकस्थळावर पुष्पचक्र अर्पण करून दिवंगत योद्ध्यांना आदरांजली अर्पण केली. विजापूर येथे विविध कार्यक्रमांबरोबरच ‘सृजन’ हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना त्यांनी विजापूर सैनिक स्कूलच्या सहा दशकांच्या प्रवासाला उजाळा दिला व हवाई दलात सहभागी होण्याचे आवाहन केले. शाळेच्या प्राचार्य ग्रुप कॅप्टन प्रतिभा बिस्त यांनी त्यांचे स्वागत करून सैनिक स्कूलच्या प्रगतीची माहिती दिली. एअरमार्शल नागेश यांनी दि. 17 रोजी एअरमन ट्रेनिंग स्कूल बेळगाव येथे भेट दिली. एअर ऑफिसर कमांडिंग सूरज शंकर यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच त्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी बोलताना एअर मार्शल नागेश यांनी शिस्त, सक्षमता, मानसिक स्थैर्य, एकाग्रता याचे महत्त्व पटवून दिले. तसेच छात्रांना घडविण्यामध्ये प्रशिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले व वायुसैनिकांशी संवाद साधला.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article