महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी

06:45 AM Jun 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कोची

Advertisement

एअर इंडियाच्या कोचीहून लंडन येथे जाणाऱ्या विमानात सोमवारी रात्री उशिरा बॉम्ब असल्याची खोटी माहिती फोन कॉलद्वारे देण्यात आली. याच विमानातील एका प्रवाशाने रात्री 1.22 वाजता एअर इंडियाच्या कॉल सेंटरला कॉल करत ही खोटी माहिती दिली होती.

Advertisement

बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यावर सुरक्षा अधिकाऱ्यांनी पूर्ण विमानाची तपासणी केली. परंतु काहीच संशयास्पद आढळून आले नाही. तर तपासात कॉल करत खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव सुहैब असल्याचे समोर आले आहे. आरोपी केरळच्या मल्लप्पुरमचा रहिवासी असून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article